MLC Election 2023 : नाशिकमध्ये प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेसाठी आज मतदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MLC Election 2023 Latest Update : विधान परिषदेच्या (maharashtra legislative council) पदवीधर (Graduates) आणि शिक्षक (Teacher) मतदारसंघातील 5 जागांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक (Nashik) पदवीधर आणि नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघात झालेल्या घडामोडींमुळे यावेळची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये तांबे पिता-पुत्राने मविआला (MVA) झटका दिला, तर भाजपनंही (BJP) अखेरपर्यंत सस्पेन्स ठेवत शेवटी तांबेंना बळ दिलंय. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे (Satyajeet Tambe), मविआ आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. (maharashtra legislative council elections in five constituencies)

ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा भाजपची रणनीती बघायला मिळाली, तर महाविकास आघाडीतील गोंधळ चर्चेत आला. त्यामुळे निवडणुकीत कोण मुसंडी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सध्या पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीकडे, तर दोन जागा भाजपकडे होत्या. महाविकास आघाडीला आपल्या जागा कायम ठेवता येतात की, भाजप मविआच्याही काही जागा हिरावून घेणार हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे.

हे वाचलं का?

Mlc Election 2023: सत्यजित तांबेंबद्दल भाजपच्या भूमिकेचा सस्पेन्स संपला

जुनी पेन्शन योजना निवडणुकीत बनली कळीचा मुद्दा

राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित, तर आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या पंजाब आणि झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार असलेल्या झारखंड अशा पाच राज्यांमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. त्यामुळे इतर राज्यातही जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातही ही मागणी सातत्यानं केली जात असून, यावेळच्या विधान परिषद निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरली. जुन्या पेन्शन योजनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात भूमिका मांडताना ती लागू करता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.

Narendra Modi यांचं मिशन BMC : अवघ्या २० दिवसांत दुसरा मुंबई दौरा!

ADVERTISEMENT

दुसरीकडे प्रचारात मात्र फडणवीसांनी भूमिका बददल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीकडून प्रचारावेळी याच मुद्द्यावरून घेरण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तडजोडीची भूमिका घ्यावी लागल्याचं दिसलं. कारण अखेरच्या टप्प्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेतली गेली.

कार्यकाळ संपत असलेले आमदार

नाशिक पदवीधर मतदारसंघ – डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस)

अमरावती पदवीधर मतदारसंघ -डॉ. रणजित पाटील (भाजप)

कोकण शिक्षण मतदारसंघ -बाळाराम पाटील (शेकाप)

नागपूर शिक्षक मतदारसंघ – नागा गाणार (भाजप)

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ – विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

OPS : विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजर असलेली ‘जुनी पेन्शन योजना’ काय आहे?

विधान परिषद निवडणूक : सध्या निवडणूक लढवत असलेले उमेदवार

नाशिक पदवीधर : अपक्ष शुभांगी पाटील (महाविकास आघाडी पुरस्कृत) विरुद्ध अपक्ष सत्यजित तांबे (भाजपचा पाठिंबा)

अमरावती पदवीधर : धीरज लिंगाडे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. रणजित पाटील (भाजप)

कोकण शिक्षक : बाळाराम पाटील (शेकाप) विरुद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)

औरंगाबाद शिक्षक : विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध किरण पाटील (भाजप)

नागपूर शिक्षक : सुधाकर अडबाले (काँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध नागो गाणार (भाजप पुरस्कृत)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT