Maharashtra Lockdown : आज दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद, लेव्हल तीनचे निर्बंध लागू
कोरोना विषाणूच्या डेल्डा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांचा लेव्हलवर ३ मध्ये समावेश केला आहे. राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असला तरीही भविष्यात येऊ शकणारी तिसरी लाट पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंधात वाढ केली आहे. राज्यातील सर्व दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता […]
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूच्या डेल्डा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांचा लेव्हलवर ३ मध्ये समावेश केला आहे. राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असला तरीही भविष्यात येऊ शकणारी तिसरी लाट पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंधात वाढ केली आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील सर्व दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाच वाजल्यानंतर राज्यात संचारबंदी लागू असणार आहे. कोरोना व्हायरसच्या डेल्हा व्हेरिएंटचे रुग्ण वाढत चालल्यामुळे निर्बंधात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अनलॉकची घोषणा करताना सरकारने जिल्ह्यांची पाच स्तरात विभागणी केली होती. परंतू डेल्टा व्हेरिएंटचा वाढता प्रभवा पाहता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व जिल्हे लेव्हर ३ मध्ये समाविष्ट केले आहेत.
आजपासून राज्यात कशी परिस्थिती असेल हे पाहूयात –
हे वाचलं का?
पुणे :
– आजपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
ADVERTISEMENT
– अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
ADVERTISEMENT
– मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
– उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
– खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
– अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.
– लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक
– अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
– पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
– कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील
कल्याण-डोंबिवलीतही नवे निर्बंध –
– या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील.
– हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरु ठेवता येतील.
– मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाही.
– कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरु राहतील तर दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
– सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल.
– खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील.
– लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल.
सोलापूरातही नव्या निर्बंधांची घोषणा –
– शहरातील सर्व दुकानांना आता संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी
– बिगर अत्यावश्यक सेवा शनिवार रविवार संपूर्ण बंद
– मॉल्स, थिएटर संपूर्ण पणे बंद
– सोमवार ते शुक्रवार पर्यंत हॉटेल्स रेस्टॉरंट संध्याकाळी 4 पर्यंत त्यानंतर रात्री 11 पर्यंत केवळ पार्सलची सुविधा
– सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी तर 5 नंतर संचारबंदी
– आज सकाळी 7 वाजल्यापासून आदेश लागू
यवतमाळ – नवीन निर्बंधांनुसार अत्यावश्यक सेवेतली दुकानं ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. सोमवार ते शुक्रवार दुकानं ४ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मूभा, शनिवार-रविवार पूर्णतः बंद असणार आहे. हॉटेल-रेस्टॉरंट, बँका ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. याव्यतिरीक्त शाळा-कॉलेज, मंदीर, खासगी शिकवण्या बंद राहणार आहेत.
जालना – संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं आणि आस्थापना संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं शनिवार-रविवार बंद असतील. हॉटेल ही ५० टक्के क्षमतेने ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
याव्यतिरीक्त विदर्भातील चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्येही दुकानांची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. याचसोबत अत्यावश्यक सेवेत न येणारी दुकानं शनिवार-रविवार बंद राहणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT