लाइव्ह

Maharashtra Breaking News Live: 'या' दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Breaking News Live
Maharashtra Breaking News Live
social share
google news

Maharashtra Breaking news Updates: महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या मुद्यावरुन बरंच राजकारण तापलं आहे. त्यातच आज (16 जुलै) काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज यांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.  

ADVERTISEMENT

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या आज अचानक बारामतीतील मोदी बागेत गेल्या. जिथे शरद पवार यांचं निवासस्थान आहे. पण पवारांच्या निवासस्थानी त्या नेमक्या का गेल्या, त्यांची शरद पवारांशी भेट झाली का? याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, याशिवाय इतरही दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यासंदर्भातील अपडेट्स आपल्याला इथे पाहता येतील...

तर महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हवामानाचे नेमके अपडेट्सबद्दल लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहा.

ADVERTISEMENT

  • 09:38 AM • 17 Jul 2024

    Maharashtra LIVE Update: विशाळगडावरील घटनेचा वादग्रस्त व्हिडीओ Viral, जालन्यात मुस्लिम समाजाचा जमाव सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल

    विशाळगडावर झालेल्या प्रकाराचा वादग्रस्त व्हिडीओ इंस्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल करून त्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने जालन्यातील काल (16 जुलै) रात्री उशिरा सदर बाजार पोलीस ठाण्यात मुस्लिम जमाव मोठ्या संख्येने दाखल झाला. 

    दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर तरुणाने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने केली गेली. अचानक पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांचा मात्र एकच गोंधळ उडाला. 

    पोलिसांनी जमावाला शांत राहण्याच आवाहन करत, याप्रकरणी कायदेशीर कारवाई केल्या जाईल असं आश्वासन देत जमावाला घरी जाण्याचे आवाहन केलं. मात्र जोपर्यंत तरुणावर गुन्हा दखल होऊन कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका या जमावाने घेतली होती. 

    पोलिसांनी या प्रकारणी अधिक तपास सुरु केला असून संबंधित तरुणाचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी धाव घेत सदर बाजार पोलिस ठाण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.

  • 09:36 AM • 17 Jul 2024

    Ashadhi Ekadashi 2024: 'या' वारकरी दाम्पत्याला मिळाला शासकीय पुजेचा मान

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकरी असलेले बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई अहिरे या वारकरी दाम्पत्याला यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. या दाम्पत्याने मुख्यमंत्री शिंदेंसोबतच विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. मागील 16 वर्षांपासून हे दाम्पत्य वारी करत आहेत. 

  • 09:32 AM • 17 Jul 2024

    Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज (17 जुलै) पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री शिंदेंनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा केली. 

follow whatsapp

ADVERTISEMENT