बदलापूर एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 2 ते 3 किमी अंतरावर आग पसरली
Badlapur News : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील खरवई एमडीसी परिसरात 7 डिसेंबर रोजी रात्री पॅसिफिक केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याने भीतीची लाट पसरली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्या ज्वाला किमान 2 ते 3 किमी अंतरावरून दिसत होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बदलापूर एमआयडीसीत पॅसिफिक केमिकल कंपनीत आठ ते दहा शक्तिशाली स्फोट
खरवई एमआयडीसी कॉम्प्लेक्सला आगीचा वेढा
Badlapur News : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील खरवई एमडीसी परिसरात 7 डिसेंबर रोजी रात्री पॅसिफिक केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याने भीतीची लाट पसरली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्या ज्वाला किमान 2 ते 3 किमी अंतरावरून दिसत होत्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा : मुंबईत खळबळ, प्रचार सुरु असताना एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला
एमआयडीसीत पॅसिफिक केमिकल कंपनीत आठ ते दहा शक्तिशाली स्फोट
प्राथमिक माहितीनुसार, खरवई एमआयडीसीत पॅसिफिक केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांची मते, सुमारे अर्ध्या तासाच्या कालावधीत, 15 मिनिटांच्या अंतराने आठ ते दहा शक्तिशाली स्फोट झाले होते, यामुळे आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये आणि निवासी असलेल्या भागात एकच खळबळ उडाली आहे.
खरवई एमआयडीसी कॉम्प्लेक्सला आगीचा वेढा
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, बदलापूर अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या या तात्काळपणे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अशातच सध्या पूर्ववत परिस्थितीसाठी काही वेळ जाईल अशी शक्यता आहे. स्फोट आणि आगीने संपूर्ण खरवई एमआयडीसी कॉम्प्लेक्सला वेढा घातला गेला होता. आता परिस्थिती अटोक्यात आणण्याचे काम करण्यात आल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचा : सहा वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मृतदेह बॅगेत भरून नाल्यात फेकला, हादरवून टाकणारी घटना
या प्रकरणी महत्त्वाची माहिती म्हणजे, एकही जीवितहानी झालेली नाही, जरी मोठं नुकसान झालं असलं तरीही प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्फोटाचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही.










