लाइव्ह

Maharashtra News Update : "राम राम म्हणायची वेळ येईल", नारायण राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा

ADVERTISEMENT

नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
social share
google news

Marathi News LIVE Update : 'महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीतील सर्व पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील. जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल, असं स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

 

उद्धव ठाकरेंनी शाहांबद्दल काय केला गौप्यस्फोट... ऐका संपूर्ण भाषण

 

 

लाइव्हब्लॉग बंद

 • 10:22 PM • 08 Mar 2024

  "राम राम म्हणायची वेळ येईल", नारायण राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा

  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक घमासान सुरू आहे. या मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने शिवसेनेचे रामदास कदम यांनी भाजपने केसाने गळा कापू नका, असे विधान केले. त्याला उत्तर देताना नारायण राणे यांनी थेट इशाराच दिला. 

  "आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग?जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल", असा इशारा राणे यांनी दिला आहे. 

  Narayan rane warned eknath shinde's shiv sena.
  शिवसेना नेत्यांकडून भाजपवर झालेल्या टीकेला उत्तर देणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ट्विट.
 • 05:03 PM • 08 Mar 2024

  रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कारखाना जप्त!

  रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कारखाना जप्त केला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई. कन्नड सहकारी साखर कारखाना असं त्याचं नाव असून ईडीकडून तो जप्त करण्यात आलेला आहे. 

 • 03:50 PM • 08 Mar 2024

  गडकरींची उमेदवारी... राऊत म्हणाले, "या कारस्थानात फडणवीसही आनंदाने सामील झाले"  

  नितीन गडकरी यांचं भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नव्हते. त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, "सत्य असे आहे की: देवेंद्र फडणवीस हे मोदी शाह यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे हा केवळ बहाणा आहे. गडकरींच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत", असा आरोप राऊतांनी ट्विट करत फडणवीसांना केला आहे.

   

  Sanjay Raut tweet About Nitin Gadkari
  नितीन गडकरी यांच्या नावाचा पहिल्या यादीत समावेश का नाही, या मुद्द्यावर संजय राऊत यांनी ट्विट केले.
 • 02:39 PM • 08 Mar 2024

  भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

  'सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे.' असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केली.

 • ADVERTISEMENT

 • 02:37 PM • 08 Mar 2024

  'खोक्यावर लाथ मारून खुद्दारीचा निर्णय आम्ही घेतला'; ओमराजे निंबाळकर गरजले

  'खोक्यावर लाथ मारुन आम्ही खुद्दारीचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. भाई और बहनों असे म्हणत ओम राजे यांनी कार्यक्रमात बोलायला सुरूवात केली. मोदींचा आवाजात सोयाबीनका भाव कितना असाही त्यांनी सवाल केला.

   

 • 02:24 PM • 08 Mar 2024

  "उद्धवजी, कल आप को आना है", शाहांनी फोनवर काय सांगितलेलं?

  कळंबच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर टीकेचे बाण डागले. ते म्हणाले, "ज्या गृहमंत्र्याला (अमित शाह) हे नामांतर कुणी केलं माहिती नाही, ज्याला शिवसेना पक्षप्रमुख कोण माहिती नाही , मग आता त्या अमित शाहाला विचारा की २०१९ साली तुम्ही मातोश्रीवर भेटायला आला होतात. का म्हणून भेटायला आला होतात? सत्यनारायणाच्या प्रसादासाठी आला होता का? प्रसाद तर तुम्हाला हवाच होता, कारण शिवसेनेची मते तुम्हाला पाहिजे होती. त्यावेळी (अमित शाह) मला फोन करत होते की, अरे उद्धवजी, कल आप को आणा है. मी म्हटलं क्यो कहा पे? ते (अमित शाह) म्हणाले की, कल मैं अहमदाबाद से फॉर्म भरने वाला हूँ, तो आप को तो आणा चाहिए. मग गेलो. पुन्हा फोन आला की, उद्धवजी, परसो आप को आणा है वाराणसी. मी म्हटलं कशाला. ते म्हणाले मोदीजी फॉर्म भरनेवाले है. पुण्याची सभा आटोपून मी मध्यरात्री वाराणसीमध्ये गेलो होतो. मग कशाला बोलवलं होतं. जा सुप्रीम कोर्टात जाऊन सांगा की, आम्ही यांच्याकडे टाईमपास करायला गेलो होतो", अशी टीका ठाकरेंनी केली. 

 • ADVERTISEMENT

 • 02:13 PM • 08 Mar 2024

  हुकुमशहा सूराचा पराभव करा, उद्धव ठाकरे

  "मी राज्यातीलच नव्हे तर देशातील माता भगिनींना हात जोडून विनंती करतोय की, आम्ही संघर्षाला उतरलोय. आपण सगळ्यांनी महिषासूर मर्दिनीचं रुप धारण करा आणि जी हुकुमशाही भारतमातेला गिळायला निघाली आहे, त्या हुकुमशहासूराला खतम करा", असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कळब येथील सभेत केले.

 • 01:57 PM • 08 Mar 2024

  निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार! तनपुरेंनी सांगूनच टाकलं

  लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना छत्रपती संभाजीनगर दक्षिण लोकसभा ही यंदाच्या वर्षी चांगलीच रंगणार असे चित्र दिसून येत आहे. अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील अशी आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येत लोकसभा निवडणुक लढवतील असा विश्वास यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

 • 01:45 PM • 08 Mar 2024

  शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी सहा ठिकाणी ईडीचे छापे

  ईडीने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये राज्य शिक्षक भरती घोटाळ्यातील मध्यस्थ संबंधित असलेल्या सहा ठिकाणी छापेमारी केली.

 • 01:22 PM • 08 Mar 2024

  इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेसाठी उमेदवारी, PM मोदींनी स्वत: केलं ट्विट!

  इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी घोषित केले आहे. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. आत पीएम मोदींनी ट्विट करून माहिती दिली आहे की, 'मला आनंद आहे की भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह अनेक क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या 'महिला शक्ती'चा एक सशक्त पुरावा आहे, जी आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यात महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.'

 • 12:17 PM • 08 Mar 2024

  पुढचं सरकार मोदींच सरकार नसणार - उद्धव ठाकरे 

  पुढचं सरकार मोदींच सरकार नसणार आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये केला.

 • 11:34 AM • 08 Mar 2024

  '5 वर्ष जनतेला गॅसवर ठेऊन निवडणुकीच्या काळात...', मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंची टीका!

  'आपण एक आघाडी स्थापन केली आहे आणि त्याला नाव इंडिया असं दिलं आहे. इंडिया नाव दिल्याबरोबर भाजपला घाम फुटला कारण, आता होणार कसं? इंडियाच, इंडियाशी लढणार कसं? इंडिया म्हणजे भारत, हिंदुस्तान. मग मोदीजींनी काय केलं? एकदम खालच्या स्तराला जाऊन टीका केली. ते म्हणाले, इंडिया म्हणजे इंडियन मुजाहिद्दीन. मग मी त्यांना उत्तर दिलं होतं, मोदीजी जेव्हा आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जाता तेव्हा तुमची ओळख PM of India अशी होते की, PM of इंडियन मुजाहिद्दीन अशी होते? यानंतर ते काही बोलायचे बंद झाले पण आता पुन्हा एकदा ते घोषणांचा पाऊस पाडत आहेत. पुढचं सरकार मोदींचं नसणार आहे. आजसुद्धा मी पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींच्या किंमती त्यांनी कमी केलेल्या आहेत हे निवडणुकींच्या काळात होणार आणि एकदाका आपण बटण दाबलं की दुसऱ्या दिवशी बघाल सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. आता 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेऊन निवडणुकीच्या काळात किंमती कमी करायच्या हे यांचं नाटक आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली. 

 • 10:08 AM • 08 Mar 2024

  उदय सामंत यांची ठाकरेंवर जहरी टीका

  'काही लोकं जामनगरला दोन वाजता लॅंड झाली. ते विमान अदानीचे होते, अंबानीचे नव्हते. अदानीचं विमान फिरायला चालतं, अदानीचं विमान जामगरला जायला चालत. पण प्रकल्प अदानींनी करू नये अशा प्रकारची वाईट राजकीय प्रवृत्ती वाढतेय. या प्रवृत्तीमुळे आपणा सर्वांचा तोटा होत आहे,' असं म्हणत उदय सामंतांनी जहरी टीका केली आहे. 

 • 09:43 AM • 08 Mar 2024

  स्वस्त झाली गॅस सिलेंडरची किंमत, PM मोदींकडून गिफ्ट

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी खेळली. गेल्या काही वर्षांपासून गॅसच्या किंमती दुप्पटीहून अधिक झाल्या. किचन बजेट वाढल्याने नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याची खेळी खेळण्यात आली आहे.

   

 • 09:42 AM • 08 Mar 2024

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर-सांगली जिल्हा दौऱ्यावर

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर-सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. पहाटे विविध कामाचे लोकार्पण व भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करणार तर दुपारी १२.०० वाजत कोल्हापूर माणगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त स्मारकाचे लोकार्पण करणार आहेत. सायंकाळी सांगलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठीही ते उपस्थित राहतील.

   

 • 09:39 AM • 08 Mar 2024

  कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ!

  केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे हा महागाई भत्ता आता 50 टक्क्यांवर गेला आहे. तसेच, ग्रॅच्युईटीची मर्यादा वीस लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

follow whatsapp

ADVERTISEMENT