महाराष्ट्रात 52 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 90 टक्के

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात 52 हजार 898 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 49 लाख 27 हजार 480 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 90.69 टक्के इतका झाला आहे. 28, 438 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 679 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर मृत्यू दर हा 1.54 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 15 लाख 88 हजार 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 33 हजार 506 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ADVERTISEMENT

आज घडीला राज्यात 30 लाख 97 हजार 161 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 25 हजार 4 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 4 लाख 19 हजार 727 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या ही सातत्याने कमी होताना दिसते आहे. ही नक्कीच एक चांगली बाब म्हणता येईल. मात्र त्याचवेळी चिंतेची बाब ही ठरते आहे की महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंचं प्रमाण हे वाढतं आहे.

दरम्यान, आज राज्यात आढळलेल्या नव्या 28 हजार 438 कोरोना रूग्णांमुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 54 लाख 33 हजार 506 इतका झाला आहे. त्यापैकी 4 लाख 19 हजार 727 अॅक्टिव्ह रुग्ण असून 49 लाख 27 हजार 480 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात 3 कोटी 15 लाख 88 हजार 717 कोरोना चाचण्या केल्या असून त्यापैकी 54 लाख 33 हजार 506 नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT