Maharashtra Corona Cases: महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8602 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची चिंता अधिक वाढली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही अद्यापही कमी होत नसून त्यात थोड्या प्रमाणात वाढच होत आहे. यामुळे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनासमोरील आव्हानं वाढली आहेत. दुसरीकडे कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट देखील सापडत आहेत. त्यामुळे कोरोना नेमका कसा नियंत्रणात […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8602 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची चिंता अधिक वाढली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही अद्यापही कमी होत नसून त्यात थोड्या प्रमाणात वाढच होत आहे. यामुळे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनासमोरील आव्हानं वाढली आहेत. दुसरीकडे कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट देखील सापडत आहेत. त्यामुळे कोरोना नेमका कसा नियंत्रणात आणायचा हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, दिवसभरात 170 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,26,390 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 8602 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 06 हजार 764 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हे वाचलं का?
राज्यात 14 जुलै रोजी 6,067 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 59,44,801 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.17 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 170 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,46,09,276 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,81,247 (13.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,80,771 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,309 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,06,764 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
ADVERTISEMENT
-
मुंबई (Mumbai) – 11 हजार 088
ठाणे (Thane) – 16 हजार 096
पुणे (Pune) – 17 हजार 389
नागपूर (Nagpur) – 2 हजार 279
नाशिक (Nashik)- 3 हजार 314
कोल्हापूर (Kolhapur) – 11 हजार 784
अहमदनगर (Ahmednagar) – 3 हजार 898
सातारा (Satara) – 7 हजार 850
सांगली (Sangli)- 10 हजार 746
औरंगाबाद (Aurnagabad)- 469
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 17 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात देखील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 16 हजारांच्या वर आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील सध्या 11 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
Black Fungus : महाराष्ट्रात आत्तापर्यंत 9 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना लागण, 1 हजारांपेक्षा जास्त मृत्यू
मुंबईत दिवसभरात सापडले 635 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 635 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 582 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 29 हजार 250 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के आहे. डबलिंग रेट 928 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT