देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतातली कोरोनाची दुसरी लाट 2021च्या जुलै महिन्यापर्यंत ओसरू शकेल आणि त्यानंतर सहा ते आठ महिन्यात भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल असं भाकित भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अभ्यासकांकडून केलं गेलंय. विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून अभ्यासकांचं तीन सदस्यिय पॅनल तयार केलं गेलं, त्यांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आलीय.

ADVERTISEMENT

या मॉडेलच्या आधारे अभ्यासकांनी सांगितलं की, मे महिन्याच्या अखेरीस देशात 1.5 लाख रुग्ण प्रतिदिवस आढळत असलीत, जूनच्या अखेरीस हे प्रमाण 20 हजारांपर्यंत कमी झालेलं असेल.

कोणत्या राज्यांमध्ये कोरोना लाटेचा पीक येऊन गेलाय याचं उत्तर देताना या पॅनेलचे सदस्य असलेले आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्किम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा या व्यतिरिक्त दिल्ली आणि गोव्यात येऊन गेलाय.

हे वाचलं का?

कोणत्या राज्यांमध्ये अजूनही अधिक धोका आहे?

तामिळनाडूत 29 ते 31 मेच्या दरम्यान कोरोना लाटेचा पीक येण्याची शक्यता आहे. पाँडिचेरीत 19 ते 20 मे या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक येऊ शकतो.

ADVERTISEMENT

आसाम – 20 ते 21 मे

ADVERTISEMENT

मेघालय – 30 मे

त्रिपुरा – 26 ते 27 मे

हिमाचल प्रदेश – 24 मे

पंजाब – 22 मेच्या दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येईल.

पॅनेलने तिसऱ्या लाटेबद्दल काय सांगितलं?

सुत्रा मॉडेलनुसार, तिसरी लाट 6 ते 8 महिन्यांत येण्याची शक्यता अधिक आहे. पण त्याचा प्रभाव कमी करता येईल. लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेने कमी प्रमाणात नुकसान होईल, असं प्रो. मनिंद्र अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

हे एक गणिती मॉडेल आहे, ज्याच्या मदतीने महामारीचा प्रभाव, तिव्रतेबाबत शक्यता वर्तवल्या जातात आणि त्या मदतीने शासनाला धोरणात्मक निर्णय घेता येतात. 2020 पासून कोरोनाच्या अभ्यासाठी या मॉडेलचा वापर केला जातोय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT