Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉक संदर्भात नवीन नियमावली जाहीर करत गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेला संभ्रम संपुष्टात आणला. सोमवारपासून राज्यात अनलॉकचे नवे नियम जाहीर होणार आहेत. कोरोना रुग्ण पॉजिटीव्हीटीचा रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावर आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने हे निर्बंध शिथील करण्यासाठी ५ स्तर निश्चीत केले असून पॉजिटीव्हीटी […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉक संदर्भात नवीन नियमावली जाहीर करत गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेला संभ्रम संपुष्टात आणला. सोमवारपासून राज्यात अनलॉकचे नवे नियम जाहीर होणार आहेत. कोरोना रुग्ण पॉजिटीव्हीटीचा रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावर आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने हे निर्बंध शिथील करण्यासाठी ५ स्तर निश्चीत केले असून पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड हे दोन निकष लावून जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी परिस्थिती कशी राहणार आहे हे जाणून घेऊयात.
पहिल्या स्तरातले जिल्हे – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
हे वाचलं का?
दुसऱ्या स्तरातले जिल्हे – हिंगोली, नंदुरबार
तिसऱ्या स्तरातले जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
ADVERTISEMENT
चौथ्या स्तरातले जिल्हे – पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
ADVERTISEMENT
पाचव्या स्तरातले जिल्हे – या गटात अद्याप कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलेलं नसलं तरीही आठवड्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्ह्याचा पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर गेला तर हा जिल्हा या रेड झोनमध्ये येऊ शकतो.
(विशेष टीप : – सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हे संभाव्य जिल्हे या गटवारीत मोडले जातात. परंतू यासंबंधीचा अंतिम निर्णय हा स्थानिक जिल्हा-पालिका प्रशासन घेणार आहे.)
जिल्ह्यांची वर्गवारी करताना राज्य सरकारने जाहीर केलेले निकष –
१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे
२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे
५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
सरकारी आदेश आणि नियमानुसार पहिल्या स्तरातील जिल्ह्यांना या अनलॉकच्या नियमांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती पाहता आठवड्याला या यादीमध्ये बदल होणार आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकारी स्थानिक सरकारी यंत्रणांना देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT