Maharashtra Unlock : …तर पुन्हा धोका वाढेल, कोरोनाचं संकट अजुनही कायम ! तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं मत
महाराष्ट्र सरकारने राज्यात ७ जून पासून अनलॉकची घोषणा केली आहे. जिल्ह्यांमधला पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांवर जिल्हे अनलॉक होणार आहेत. परंतू राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते सध्याची कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून, निर्बंध शिथील केल्यानंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी वाढली तर धोका वाढू शकतो. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ९६ हजार ९८४ […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकारने राज्यात ७ जून पासून अनलॉकची घोषणा केली आहे. जिल्ह्यांमधला पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांवर जिल्हे अनलॉक होणार आहेत. परंतू राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते सध्याची कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून, निर्बंध शिथील केल्यानंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी वाढली तर धोका वाढू शकतो.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ९६ हजार ९८४ एवढे कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. ४ जून रोजी राज्यात १४ हजार १५२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता निर्बंध शिथील करण्यात आले असले तरीही कोरोनाला कमी लेखून चालणार नाहीये.
Maharashtra Unlock : अखेर संभ्रम संपला, राज्यात सोमवारपासून अनलॉक, सरकारकडून नियमावली जाहीर
हे वाचलं का?
“आर्थिक दृष्टीकोनातून जर निर्बंध शिथील करणं गरजेचं असेल तर हे योग्य आहे पण आपण अजुनही संकटावर मात केलेली नाहीये. गेल्या एक ते दीड वर्षातला अनुभव पाहता आपण निर्बंध शिथील करुन परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे.” P.D. Hunduja रुग्णालयात Consultant Pulmonologist म्हणून काम करणाऱ्या डॉ. लान्सलॉट पिंटो यांनी आपलं मत नोंदवलं. जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांना लस दिली जात नाही तोपर्यंत सरकारने मास्कचा वापर करणं जनतेसाठी बंधनकारक करणं गरजेचं असल्याचंही डॉ. पिंटो यांनी सांगितलं.
टप्प्या-टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करुन जेव्हा कधीही शक्य असेल तेव्हा घरातून काम करणं, अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या वस्तूंना ऑनलाईन बिझनेससाठी प्रोत्साहन देणं या गोष्टींना अजून प्रोत्साहन मिळायला हवं या गोष्टींकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागणार असल्याचं डॉ. पिंटो म्हणाले. सरकारने ५ स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली असून पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यांना अनलॉकचे फायदे मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Unlock : ऑक्सिजन बेड, पॉजिटीव्हीटी दर; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे परिस्थिती?
ADVERTISEMENT
Wockhardt Hospital मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. तुषाऊ प्रसाद यांनी मुंबई तक शी बोलत असताना आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी अजुनही झुंजत आहोत ही आठवण करुन दिली. लॉकडाउन काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीत आपल्याला सावध राहणं गरजेचं असल्याचं डॉ. प्रसाद म्हणाले. तसेच लोकांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला हलकं लेखू नये असंही आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
पुन्हा एकदा मोठ्या संख्येने गर्दी रस्त्यावर आली आणि त्यांनी नियम पाळले नाहीत तर धोका वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात येऊ शकणारी कोरोनाची तिसरी लाट आणि मान्सूनमुळे होणारे इतर साथीचे आजार हे लक्षात घेता लोकांनी जास्तीत जास्त काळ घरात राहून शक्य तितक्या लवकर लस घेणं गरजेचं आहे. अनेकदा निर्बंध शिथील झाले की लोक घराबाहेर पडतात, मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत. अशा घटनांमुळेच कोविडचा संसर्ग वाढतो. त्यामुळे या सर्व नियमांचं पालन झालं तर भविष्यातली येणारी तिसरी लाट आपण थोपवू शकतो असंही डॉ. प्रसाद यांनी स्पष्ट केलं.
Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT