पत्रिकेत मंगळ असणं हे घटस्फोटाचं कारण ठरु शकत नाही – हायकोर्ट

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका व्यक्तीच्या घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करत महत्वाचा निर्णय दिला आहे. पत्रिकेत मंगळ असणं किंवा नसणं हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही असा निर्णय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर आणि एन.बी.सूर्यवंशी यांनी दिला. पतीने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात, लग्न करण्यासाठी पत्नीने आपल्या पत्रिकेत बदल करुन आपल्याला मंगळ असल्याचं दाखवलं होतं. याआधी या व्यक्तीने फॅमिली कोर्टातही घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतू तिकडेही हा अर्ज फेटाळण्यात आला.

ADVERTISEMENT

“पत्नीला मंगळ असो किंवा नसो…ही गोष्ट क्रुरता ठरत नाही. काही क्षणांसाठी आपण पत्नीने जन्मतारखेमध्ये बदल केला असं धरुन चाललं तरीही यामधून दोघांच्याही वैवाहिक जिवनात प्रॉब्लेम आहेत असं दिसत नाही. घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधी पतीच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि त्याला मंगळ असलेल्या मुलीशीच लग्न करायचं आहे हे सिद्ध करण्यात तो अयशस्वी ठरला आहे.” त्यामुळे घटस्फोटासाठी हे कारण पुरेसं नसल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलंय. पत्नीने आपल्या जन्मतारखेत बदल करुन आपली फसवणूक केल्याची तक्रार पतीने केली होती.

पत्नीने कोर्टात आपली बाजू मांडताना लग्न ठरताना दोन्ही बाजूकडून पत्रिका पाहिल्याच गेल्या नसल्याचं सांगितलं. तसेच आपल्या जन्मतारखेविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोपही पत्नीने फेटाळून लावला. पती आणि सासूकडून आपल्याला मारहाण होत असून आपल्या जिवाला धोका असल्याचं पत्नीने कोर्टासमोर सांगितलं. महत्वाची गोष्ट म्हणजे निकाल देताना कोर्टाने लग्नाआधी तक्रारदार व्यक्ती खासगी कंपनीत कामाला होता. परंतू लग्नानंतर त्याला सरकारी नोकरी लागली. त्यामुळे पत्रिकेत मंगळ असल्यामुळे वैवाहिक जिवनात काही तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती अजिबात नाहीये असं निरीक्षण नोंदवत घटस्फोटोचा अर्ज फेटाळून लावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT