Lockdown चा फटका मुंबईतल्या दुग्ध-व्यवसायाला ! आरे कॉलनीत शेकडो लिटर दूध जातंय वाया
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. १ मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व गोष्टी या काळात बंद असणार आहेत. राज्य सरकारच्या या लॉकडाउनचा फटका आता मुंबईतल्या दुग्ध व्यवसायालाही बसायला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या आरे कॉलनीतील तबेल्याच्या मालकांवर दररोज शेकडो लिटर दूध फेकून […]
ADVERTISEMENT
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. १ मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व गोष्टी या काळात बंद असणार आहेत. राज्य सरकारच्या या लॉकडाउनचा फटका आता मुंबईतल्या दुग्ध व्यवसायालाही बसायला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या आरे कॉलनीतील तबेल्याच्या मालकांवर दररोज शेकडो लिटर दूध फेकून देण्याची वेळ आली आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने दूध व्यवसायिकांना अत्यावश्यक सेवेत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये दुधाची दुकानं ही संध्याकाळी उघडायला परवानगी दिली होती, परंतू यंदा राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या दुध व्यवसायिकांनाही ठराविक वेळ आखून दिली आहे, ज्याचा फटका या व्यवसायिकांना बसतो आहे. दुभती जनावरं ही सकाळ आणि संध्याकाळी दूध देतात. त्यामुळे संध्याकाळी मिळणारं दुध दुसऱ्या दिवशी फार कोणी विकत घेत नसल्यामुळे या व्यवसायिकांना हे दुध फेकून द्यावं लागत आहे.
मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची लवकरच उभारणी
हे वाचलं का?
मुंबईच्या आरे कॉलनीतील तबेल्यांमध्ये १७ हजार म्हशी आहेत. परंतू ब्रेक द चेन च्या माध्यमातून राज्य सरकारच्या नियमांमुळे या व्यवसायिकांना एकावेळचं दुध खपत नसल्यामुळे फेकून द्यावं लागत आहे. प्रत्येक दिवशी आरे कॉलनीतले दूध व्यवसायिक शेकडो लिटर दूध फेकून देत आहेत, ज्याचा आर्थिक फटका या व्यवसायिकांना बसताना दिसत आहे. म्हणूनच राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या दूध व्यवसायिकांना संध्याकाळी दूध विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आता व्यवसायिकांकडून होताना दिसत आहे.
याआधी वर्षभरापूर्वी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील अनेक व्यापारी, दुकानदार यांचं कंबरडं मोडलं होतं. आर्थिक फटका बसलेले हे व्यापारी आता कुठे सावरत असताना पुन्हा एकदा लॉकडाउनची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली आहे. त्यातच राज्य सरकारच्या कडक नियमांमुळे अजुनही अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपलं आर्थिक नुकसान भरुन कसं काढायचं हा मोठा प्रश्न या व्यवसायिकांसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT
वाहनांसाठीचा ‘कलर कोड’चा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला मागे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT