शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात साहित्यिक विश्व नाराज; पुरस्कार वापसी अन् राजीनामा सत्र
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ आत्मकथनाच्या मराठी अनुवाद पुस्तकासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला 2021 चा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. नक्षलवादाचे समर्थन करणार पुस्तक असल्याचं म्हणत शासन आदेश काढून हा पुरस्कार रद्द केल्याची घोषणा करण्यात […]
ADVERTISEMENT
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ आत्मकथनाच्या मराठी अनुवाद पुस्तकासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला 2021 चा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. नक्षलवादाचे समर्थन करणार पुस्तक असल्याचं म्हणत शासन आदेश काढून हा पुरस्कार रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.
ADVERTISEMENT
दरम्यान, शिंदे सरकारच्या या निर्णयावरुन साहित्यिक विश्वात मध्ये मोठी नाराजी पसरली आहे. विविध लेखक आणि कवी यांनी अनघा लेले यांना पाठिंबा दिला आहे. पुरस्कार रद्द करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका केली जात आहे, तसंच लेखक आणि साहित्याचा हा अपमान असल्याचीही भूमिका घेतली जात आहे. यामुळे आज सकाळपासूनच पुरस्कार परत करण्याचं आणि राजीनामा देण्याचं सत्र सुरु झालं आहे.
प्रज्ञा दया पवार आणि कवयित्री नीरजा यांचा राजीनामा :
अनघा लेले अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार सरकारकडून तडकाफडकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्या प्रज्ञा दया पवार आणि कवयित्री नीरजा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आज दुपारी पवार यांनी तर सायंकाळी नीरजा यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
हे वाचलं का?
शरद बाविस्कर आणि आनंद करंदीकर यांच्याकडून पुरस्कार परत :
अनघा लेले यांच्या समर्थनार्थ ‘भुरा’ कादंबरीचे लेखक शरद बाविस्कर यांच्याकडून प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी मिळालेला लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार परत करण्यात आला आहे. त्यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ लेखक आनंद करंदीकर यांनीही ‘वैचारिक घुसळण’ पुस्तकाला मिळालेला एक लाख रुपयांचा पुरस्कार परत केला आहे.
हेरंब कुलकर्णींचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाला नाराजी पत्र :
याशिवाय यशवंतराव चव्हाण पुरस्कार समितीचे परीक्षक हेरंब कुलकर्णी यांनीही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणि लेखिकेचा अवमान हा आपला अवमान असल्याचं म्हणतं त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच निवड समितीत काम करण्याविषयी पुन्हा विचारणा करू नये, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT