माझ्या मराठीची बोलू कौतुके… मराठी भाषा आणि भाषिकांबद्दलच्या खास गोष्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराठी जितकी प्राचीन तितकीच समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेबद्दलचे किस्से मराठी भाषा दिनानिमित्त…

हे वाचलं का?

पाकिस्तानमधील कराची शहरात असलेल्या प्रसिद्ध एन.जे.व्ही. हायस्कूलचं पूर्ण नाव नारायण जगन्नाथ हायस्कूल असं आहे. मराठमोळे नारायण जगन्नाथ यांनी १८५५ साली ही शाळा स्थापन केली होती.

ADVERTISEMENT

स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच फाळणीआधी मुंबई आणि कराची ही दोन्ही शहरं एकाच प्रांतात येत आणि अनेक मराठी भाषिकांच कराचीमध्ये येणं-जाणं असायचं.

ADVERTISEMENT

मराठी भाषिक लोक फक्त महाराष्ट्रातच राहत नाहीत.

महाराष्ट्राबाहेर म्हणजेच कर्नाटक, गोवा, गुजरात, छत्तीसगढ आणि तेलंगणासारख्या राज्यांबरोबरच हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये लाखोंच्या संख्येनं मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. आणि हे मराठीभाषिक लोक अनेक पिढ्यांपासून या प्रांतांमध्ये वास्तव्यास आहेत.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी नाळ असणारा समाज पाकिस्तान आणि थेट अफगाणिस्तानात आजही आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील बुगती, मारी तसंच बलोच समाजाची मूळं महाराष्ट्रातील आहेत असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर विखुरलेले मराठा सैन्यातील अनेक गट वेगवगळ्या प्रांतात स्थायिक झाले. हेच गट आता वेगवेगळ्या प्रांतामध्ये (राज्यांमध्ये) नव्या नावांनी ओळखले जातात, पण ते मूळ महाराष्ट्रीय वंशाचेच आहेत. (उदा. सिंदिया-शिंदे, होळकर)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT