बालपणीचा मित्रच निघाला नराधम; विवाहित शिक्षिकेवर बलात्कार, नागपूरमधली धक्कादायक घटना
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपुरातील गिट्टीखदान पोलिसांनी एका व्यक्तीला विवाहित शिक्षिकेवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रोशन अशोक खोडे असे आरोपीचे नाव असून पीडित शिक्षिका आणि आरोपी हे बालपणीचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आणि पीडिता हे एकाच शाळेत शिकत होते, काही वर्षांपूर्वी महिलेचे लग्न झाले आणि तिला दोन मुले सुद्धा झाली. […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
नागपुरातील गिट्टीखदान पोलिसांनी एका व्यक्तीला विवाहित शिक्षिकेवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रोशन अशोक खोडे असे आरोपीचे नाव असून पीडित शिक्षिका आणि आरोपी हे बालपणीचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आणि पीडिता हे एकाच शाळेत शिकत होते, काही वर्षांपूर्वी महिलेचे लग्न झाले आणि तिला दोन मुले सुद्धा झाली.
हे वाचलं का?
आरोपी रोशन हा आरटीओ मध्ये दलाल म्हणून काम करत होता, त्याच दरम्यान महिलेला वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओ मध्ये जावे लागले त्यावेळी अनेक वर्षानंतर आरोपीची आणि पीडित महिलीची भेट झाली.
आरोपीने पीडित महिलेच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेती तिला एका आश्रम शाळेत नोकरीवर सुद्धा लावून दिले, परंतु नोकरी वर लावून दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करू लागला पीडितेने मागणी फेटाळल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी वेळोवेळी आरोपी पीडितांना देत होता.
ADVERTISEMENT
पुण्यात 25 वर्षीय अभिनेत्रीवर तिघांनी केला बलात्कार; ब्ल्यू फिल्म तयार करण्याची धमकी
ADVERTISEMENT
त्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने शारीरिक संबंध होकार दिला त्यानंतर आरोपी हा वारंवार पीडित महिलेला नोकरी गमावण्याची धमकी देऊन शरीर संबंध ठेवण्याची मागणी करत होता या संपूर्ण त्रासाला कंटाळून पीडित महिलेने नागपुरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी चौकशी करून रोशन खोडे वर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT