मध्य आणि हार्बर लाइनवर मेगाब्लॉक, पाहा कसं असेल ट्रेनचं वेळापत्रक
मुंबई: कोरोनाच्या संसर्गामुळे अद्यापही सर्वांसाठी राज्यातील लोकल सेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही. मात्र, दोन डोस झालेल्या लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकल सेवा पूर्वीप्रमाणे सुरु झाली आहे. असं असताना आता मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या (26 सप्टेंबर) विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. पाहा मध्य रेल्वेवरील […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनाच्या संसर्गामुळे अद्यापही सर्वांसाठी राज्यातील लोकल सेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही. मात्र, दोन डोस झालेल्या लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकल सेवा पूर्वीप्रमाणे सुरु झाली आहे. असं असताना आता मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या (26 सप्टेंबर) विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
पाहा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक कसा असेल
26.9.2021 रोजी कळवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
हे वाचलं का?
ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वे रविवार दि. 26.9.2021 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 (10 तास) दरम्यान कळवा-मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवरब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ट्रेन चालण्याचा प्रकार खालीलप्रमाणे असेल:
कल्याण येथून सकाळी 7.27 ते संध्याकाळी 5.40 पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल, पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचेल.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ADVERTISEMENT
ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची उपनगरीय सेवा सकाळी 7.38 वा. असेल. ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी 6.02 वा. असेल.
या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक प्रभावित भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.
पाहा हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक कसा असेल
26.9.2021 रोजी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
Corona संपेपर्यंत मुंबई लोकल बंदच राहणार-विजय वडेट्टीवार
मेन लाईनवर दिवा आणि ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गासाठी 10 तासांचा विशेष ब्लॉक आधीच जाहीर करण्यात आलेला आहे. ही देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.
दरम्यान, या मेगा ब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT