पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले मर्सिडिजचे सीईओ, मग काय उतरून पायी चालू लागले आणि रिक्षा..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्याच्या वाहतूक कोंडीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. पुणे तिथे काय उणे असं कायम म्हटलं जातं. अशात पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका मर्सिडिज या प्रसिद्ध कंपनीच्या सीईओंनाही बसला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची एस क्लास मर्सिडिज सोडली आणि त्यानंतर थोडं चालत जाऊन रिक्षा पकडून इच्छित स्थळी गेले. मार्टिन श्वेक हे मर्सिडिजचे सीईओ आहेत. त्यांनी यासंदर्भातली इंस्टाग्राम पोस्टही शेअर केली आहे.

ADVERTISEMENT

नेमकी काय घडली घटना?

पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका मर्सिडिज बेंझचे भारतातले सीईओ मार्टिन श्वेंक हे त्यांच्या एस क्लास मर्सिडिजमध्ये होते. त्यावेळी पुण्यातल्या वाहतूक कोंडीला कंटाळून मार्टिन यांनी मर्सिडिज सोडली. मर्सिडिजमधून उतरून त्यांनी थोडं चालत जाऊन एक रिक्षा केली. त्यानंतर ते त्यांच्या इच्छित स्थळी गेले. यासंदर्भातला एक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे. मर्सिडिज कंपनीचे सीईओ पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने ते त्यांची एस क्लास कार सोडून चालत गेले. त्यानंतर रिक्षा पकडली आणि पुढचा प्रवास केला.

मार्टिन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

जर तुमच्याकडे तुमची एस क्लास मर्सिडिज पुण्यातल्या सुंदर रस्त्यांवरच्या ट्रॅफिकमध्ये अडकली तर तुम्ही काय कराल? तर कारमधून उतराल, चालण्यास सुरूवात कराल आणि मग काही किमी चालल्यावर रिक्षा कराल? हो ना? अशा काहीशा खास अंदाज या आशयाची पोस्ट मार्टिन श्वेंक यांनी लिहिली आहे.

हे वाचलं का?

नेटकरी इंस्टाग्रामवर काय म्हणत आहेत?

मार्टिन यांनी जी पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे त्यानंतर युजर्स त्यांना विविध रिप्लाय करत आहेत. एक युजर म्हणतो मी जर तुमच्या जागी असतो तर मी माझ्या एस क्लास मर्सिडिजमध्ये बसून राहिलो असतो. एक नेटकरी म्हणतो बसलाच होतात कारमध्ये तर एक वडा-पाव ऑर्डर करायचा ना. तर दुसरा एक युजर म्हणतो की तुम्ही कमालच केली. तर काही नेटकरी म्हणत आहेत की मार्टिन तुम्ही जमिनीशी जोडले गेलेले व्यक्ती आहात.

मार्टिन श्वेन्क हे २०१८ पासून मर्सिडिज बेंझ इंडियाचे सीईओ आहेत. २००६ पासून ते या कंपनीत काम करत आहेत. मर्सिडिज बेंजचे चीनमधले मुख्य निधी अधिकारी या पदावरही कार्यरत होते. आता ते या कंपनीत सीईओ आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT