मिलिंद नार्वेकर यांचा ‘दसरा’ शिवाजी पार्कवरच! एकाच कृतीतून शिंदे गटाच्या चर्चांना उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरतची अर्थात ठाकरेंसोबतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री उशीरा त्यांनी स्वतः शिवाजी पार्क मैदानावर जाऊन तिथल्या तयारीचा आढावाही घेतला, तसेच तिथूनच उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यामुळे नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. शिंदे गटातील गुलाबराव पाटील, दीपक केसरकर असे बडे विविध नेते याबद्दल दावा करत आहेत. अशात रविवारी रात्री 10:30 वाजता नार्वेकर शिवाजी पार्क मैदानावर पोहचले. तिथे जाऊन त्यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली. पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांना त्यांनी फोन केला. एकूण तयारीचा तपशील दिला, तयारी कुठपर्यंत आली आहे, याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी देवीचे दर्शनही घेतले

गुलाबराव पाटील यांनी नेमके काय म्हटले?

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे थापा शिंदेंसोबत आले. मला एकनाथ शिंदे यांचे विचार पटल्याने मी त्यांच्यासोबत आल्याचे थापा यांनी सांगितले. थापा यांचा संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्यावर आरोप करतात की आम्ही 50 खोके घेतले.

हे वाचलं का?

बरं मग चंपासिंह थापा यांनी काय घेतले? ज्या थापा यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण केले होते, ज्या थापांनी बाळासाहेब ठाकरेंच्या चितेला हात लावला होता ते थापाही सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येत आहेत. असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांबाबत काय म्हणाले?

मिलिंद नार्वेकर येत आहेत की नाही मला माहित नाही. मी मुख्यमंत्री आहे मला अनेक लोक भेटायला येत नाही. मी लपवून काहीही ठेवत नाही माझं सगळं पारदर्शक आहे. पोटात एक ओठात एक असं माझं काही नसतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT