MCA Election: मिलिंद नार्वेकर मैदानात! ठाकरे कुटुंब मतदानाला का आलं नाही?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मतदान नुकतंच पार पडलं. मात्र या मतदानाला ठाकरे कुटुंबाने उपस्थिती लावली नाही. मिलिंद नार्वेकर मैदानात असूनही ठाकरे कुटुंब मतदानासाठी का आलं नाही या चर्चा आता रंगल्या आहेत. MCA च्या निवडणुकीसाठी एकूण ३६८ मतदार होते. त्यापैकी ३४३ जणांनी मतदान केलं. मतदानाची वेळ संपली आहे. आता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या तिघांनीही या मतदानासाठी उपस्थिती दर्शवली नाही.

ADVERTISEMENT

MCA च्या निवडणुकीसाठी पवार-शेलार पॅनल एकत्र

MCA च्या निवडणुकीसाठी पवार शेलार पॅनल एकत्र आलं. तसंच मिलिंद नार्वेकर आणि संदीप पाटीलही मैदानात होते. या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे सगळे एकाच मंचावर आलेले पाहण्यास मिळालं. बुधवारी या निमित्ताने झालेली सगळ्यांची भाषणंही विशेष गाजली. अशात आता ठाकरे कुटुंबाने मतदान का केलं नाही? याची चर्चा सुरू झाली आहे.

संदीप पाटील विरूद्ध अमोल काळे अशी लढत

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे विरूद्ध माजी भारतीय कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात थेट लढत रंगली आहे. मतदानाची वेळ आता संपली आहे. मात्र ठाकरे कुटुंब या मतदानाला आलं नव्हतं.

हे वाचलं का?

ठाकरे कुटुंब मतदानाला फिरकलंच नाही

ठाकरे कुटुंबाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या तिघांनाही मतदानाचा हक्क होता. मात्र संपूर्ण ठाकरे कुटुंबाने या मतदानाकडे पाठ फिरवली. त्यानंतर आता भाजपने टीका केली आहे.

भाजपचे प्रसाद लाड यांनी काय म्हटलं आहे?

ठाकरे कुटुंब संकुचित विचारसरणीचं आहे. त्यांनी इथेही राजकारण आणलं. ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर निवडणुकीत असतानाही ठाकरे कुटुंब मतदानाचा हक्क बजवाला नाही. असं म्हणत प्रसाद लाड यांनी टीका केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT