मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना व्यथा सांगताना मच्छिमार महिलांना अश्रू अनावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना आपल्या व्यथा सांगताना मच्छिमार महिलांना अश्रू अनावर झाले. चक्रीवादळामुळे मुंबईत बरंच नुकसान झालं आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाड इथला दौरा केला आहे. तिथे मच्छिमार महिलांना आपल्या वेदना सांगताना अश्रू अनावर झाले. या सगळ्या महिलांना बोलताना रडू कोसळलं होतं.

ADVERTISEMENT

अस्लम शेख यांनी सांगितलं की ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन अस्लम शेख यांनी दिलं आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि अनेकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. कोळी बांधवही याला अपवाद नाहीत.

Tauktae Cyclone: बार्ज P305 जहाजावरील तब्बल 22 जणांचे मृतदेह हाती, अद्यापही 53 जणांचा शोध सुरु

हे वाचलं का?

सोमवारी दिवसभरात काय काय घडलं?

सोसाट्याचा वारा सुटल्याने मुंबईतल्या घाटकोपर-विक्रोळीच्या दरम्यान लोकल ट्रेनवर झाडाच्या फांद्या पडल्या. त्यामुळे काही काळासाठी मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. सावधगिरीचा इशारा म्हणून काही ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली त्यानंतर पूर्ववत करण्यात आली .

ADVERTISEMENT

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घटल्या. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध वास्तूजवळ असलेल्या रस्त्यांवरही पाणी जमा झालं होतं.

ADVERTISEMENT

हवामान विभागाने महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ आणि वातावरणात अचानक झालेले बदल या सगळ्यासाठी राज्याच्या प्रमुख किनाऱ्यांवर एनडीएआरएफची पथकंही तैनात करण्यात आली. लोकांनी अकारण घराबाहेर पडू नये, पडलात तरीही समुद्राजवळ मुळीच जाऊ नये असाही इशारा देण्यात आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT