चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीला मान नाहीच! शाईफेक प्रकरणात १० पोलिसांवर कारवाईचा बडगा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. शाईफेकीनंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दल 10 पोलिस आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

ADVERTISEMENT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये एका अज्ञाताने शाईफेक केली. हा समता परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील सहभागी २ जणांना पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. तसंच त्यांच्याविरोधात चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंबित केलेले पोलिस कर्मचारी आणि अधिकारी :

1. गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर

हे वाचलं का?

2. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोद

3. गणेश माने

ADVERTISEMENT

4. भाऊसाहेब सरोदे

ADVERTISEMENT

5. दीपक खरात

6. प्रमोद वेताळ

7. देवा राऊत

8. सागर संधी

9. महिला पोलीस कर्मचारी कांचन घावळे

10. महिला पोलीस कर्मचारी प्रियंका गुजर

अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावं आहेत. सोबतच या घटनेबद्दल इतर कोणाला आधीच माहिती होती का? याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत.

कुठल्याही पोलिसांचं निलंबन करू नका : चंद्रकांत पाटील

दरम्यान कालच्या या घटनेनंतर कोणत्याही पोलिसांच निलंबन करु नये अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की जे घडलं की त्यामुळे कुणाचंही निलंबन करू नका. कार्यकर्त्यांनाही मी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

कायदा हातात घेऊ नका हे मी सगळ्यांना सांगितलं आहे. मी इतर कुणाच्या कार्यकर्त्यांना काही सांगणार नाही. मी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे. हिंमत असेल तर ज्यांनी कोणी या लोकांन पाठवलं त्यांनी समोर यावं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच कुठल्याही पोलिसांवर कारवाई करू नये अशी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT