देशात कुठेही अशी पद्धत नाही ! प्रभाग रचनेच्या निर्णयावरुन Raj Thackeray सरकारवर कडाडले
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहेत. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकणार आहेत. तसंच नगरपालिका आणि नगरपरिषदा यासाठी दोन उमेदवारांना मतदान करता येणार असून नगरपंचायतीमध्ये मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल. परंतू राज्य […]
ADVERTISEMENT
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहेत. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकणार आहेत. तसंच नगरपालिका आणि नगरपरिषदा यासाठी दोन उमेदवारांना मतदान करता येणार असून नगरपंचायतीमध्ये मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल.
ADVERTISEMENT
परंतू राज्य सरकारच्या या निर्णयाला आता विरोध होताना दिसत आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका केली आहे.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय?, तुमच्या महापालिकेत नेमकी कोणती पद्धत आहे लागू?
हे वाचलं का?
“कायद्याच्या दृष्टीने पहायचं झालं तर देशात कुठेच अशा पद्धतीने महापालिका निवडणुका लढल्या जात नाहीत. मग हे महाराष्ट्रातच का सुरु झालं, याला कारणं एकच की सत्ता काबीज करणं. आपल्याला हवे तसे प्रभाग रचना करुन पैसे ओतायचे आणि निवडणुका जिंकायचा यासाठी हा प्रयत्न सुरु आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
Muncipal Election 2022: महापालिका निवडणूक होणार बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने
ADVERTISEMENT
या विषयी ५ वर्षांपूर्वीही मी बोललो होतो. २०१२मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत एकाच उमेदवाराची व्यवस्था होती. तेव्हा त्यांनी २ उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर भाजपानं ४ उमदवारांचा प्रभाग केला. आता हे सरकार आल्यावर त्यांनी आधी एक प्रभागाची रचना आणली. निवडणूक आयोगानंही एकाच उमेदवाराचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काल यांनी पुन्हा ३ उमेदवारांचे प्रभाग आणले. पण याचा त्रास लोकांनी काय भोगायचा? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांना लोकांनी का मत द्यायचं? जनतेला गृहीत धरायचं, हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
ADVERTISEMENT
यासंदर्भात राज्य सरकारवर टीका करतानाच राज ठाकरेंनी नागरिकांना देखील आवाहन केलं आहे. “माझी जनतेला विनंती आहे की लोकांनी कोर्टात, निवडणूक आयोगाकडे जायला हवं. कोणताही नगरसेवक दुसऱ्याला काम करू देत नाही. एकानं प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो. उद्या लोकांना नगरसेवकाला भेटायचं असेल, तर त्यांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? निवडणुकीची थट्टा करून ठेवलीये यांनी आणि जनता त्यावर काही बोलत नाही. आम्ही न्यायालयात गेलो तर त्याला राजकीय वास येतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT