मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणारच!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार नाहीत अशा प्रकारच्या काही बातम्या आल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार आहेत. त्याची तारीख गुरूवारी मुंबईत जाहीर केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष २१ मे रोजी पुण्यातील नदीपात्रात सभा घेणार होते. त्यासाठी तयारीही झाली होती. राज ठाकरे […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार नाहीत अशा प्रकारच्या काही बातम्या आल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार आहेत. त्याची तारीख गुरूवारी मुंबईत जाहीर केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष २१ मे रोजी पुण्यातील नदीपात्रात सभा घेणार होते. त्यासाठी तयारीही झाली होती. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच ही तारीख नक्की झाली होती. मात्र आज अचानक या बातम्या आल्या की राज ठाकरे यांची सभा रद्द झाली. त्यांच्यावर टीकाही सुरू झाली. मात्र मुंबई तकला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज ठाकरेंची सभा होणारच आहे.
हे वाचलं का?
राज ठाकरे हे जून महिन्यात अयोध्या दौरा करणार आहेत. त्याआधी या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशात राज ठाकरेंची सभा रद्द झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्यांची सभा होणारच आहे. राज ठाकरे आता मुंबईत पुण्यातल्या सभेची तारीख आणि वेळ जाहीर करणार आहेत.
राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संतांनी आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत. मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी ११ रेल्वेचं बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत.
ADVERTISEMENT
राज ठाकरे सध्या कुठला इतिहास वाचत आहेत?
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पुण्यात जी सभा घेतील त्या सभेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळासाहेबांचं सोंग घेतलेले मुन्नाभाई सध्या फिरत आहेत असं उद्धव ठाकरेंनी १४ मे रोजी घेतलेल्या सभेत म्हटलं होतं. तसंच राज ठाकरेंची खिल्लीही उडवली होती. या खिल्लीला राज ठाकरे उत्तर देणार का? आणि ते नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“मला मध्यंतरी एका शिवसैनिकाने विचारलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं संबंध काय? लगे रहोचा… मी थोडासा पाहिलाय. तर तो मला म्हणाला की त्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी त्याच्याशी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं हां मग… ? तर तो मला म्हणाला की तशी एक केस आहे आपल्याकडे. मी म्हटलं अशी कोणती केस? तर तो म्हणाला अहो ती नाही का? ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. “
“शाल घेऊन फिरतात. कधी मराठीच्या नादाला तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मी त्याला म्हटलं की अरे त्या सिनेमातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास? तर तो मला म्हणाला तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही पाहिला. त्यात शेवटी त्या संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे. तर ही केमिकल लोच्याची केस आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत फिरूद्या.. ज्यांना कुणालाही अयोध्येला जायचं आहे जाऊद्या.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT