अदानींकडे मुंबई एअरपोर्ट : मनसे म्हणते, ‘डिवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही झिंगाट दाखवावा लागेल’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आता अदानी उद्योग समुहाकडे देण्यात आलाय. या घडामोडीनंतर अदानी उद्योगसमुहाने कंपनीचं मुख्यालय मुंबईवरुन गुजरातला हलवलं आहे. परंतू यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरुन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अदानी समुहाला थेट इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अदानी उद्योग समुहाचे कर्मचारी गरबा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर मुंबईतले उद्योग गुजरातला नेण्याचा हा डाव असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेनेही या वादात उडी घेऊन, फक्त व्यवस्थापन अदानीकडे गेलंय. विमानतळ मुंबईतच आहे. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल असं ट्वीट सरदेसाई यांनी केलंय.

Mumbai Airport व्यवस्थापनाचा ताबा मिळताच अदानींकडून मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय

हे वाचलं का?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आता जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदिल दिला होता. इतर खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणं बाकी होतं. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला.

अदानी ग्रुपकडे गुवाहाटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर, तिरूअनंतपुरम विमानतळ व्यवस्थापन ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरूअनंतपुरम त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्कही अदानी समूहाला देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT