MNS: वसंत मोरेंबद्दल मनसे घेणार मोठा निर्णय?, पुणे मनसेत नवं राजकारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Vasant More Pune: पुणे: मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुण्यातील (Pune) कट्टर समर्थक माजी शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना शहरातील काही प्रमुख नेते मंडळी कार्यक्रमापासून दूर ठेवत आहे.अशी नाराजी वसंत मोरे यांनी अनेक वेळा उघडउघड बोलावून दाखवली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्न समारंभ दरम्यान भेट झाली. त्यावेळी ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय’, अशा शब्दात अजित पवार यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. त्यानंतर पुन्हा एकदा वसंत मोरे मनसेमध्ये थांबणार की, राष्ट्रवादीमध्ये जाणार या चर्चांना सुरुवात झाली. (mns will take a big decision about vasant more new politics in pune mns)

ADVERTISEMENT

त्याबाबत वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘माझ्याबाबत पक्षामध्ये ज्या काही घटना घडत आहे. त्याला बाबू वागसकर हेच जबाबदार आहेत. तसेच मी आजही राज ठाकरेंसोबतच आहे.’ अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आज (6 डिसेंबर) पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीला मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हे वाचलं का?

पुण्यात मनसेला मोठा धक्का : वसंत मोरेंचा खंदा शिलेदार 400 कार्यकर्त्यांसह पक्षातून बाहेर

या बैठकीनंतर बाबू वागसकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘आठवड्याभरात कोणती कामं करायची त्याबाबत आजची बैठक पदाधिकाऱ्यांसोबत झाली. पुणे महापालिकेने शहरी गरीब योजना बंद केली आहे. तसेच करदात्यांना 40 टक्के सवलत मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. त्यावर निर्णय झालेला नाही. या दोन विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही लवकरच आंदोलन करणार आहोत.’ असं त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

दरम्यान, वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बाबू वागसकर म्हणाले की, ‘वसंत मोरे यांच्याबाबत आजच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. तसेच येत्या दोन दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल.’ अशी भूमिका मांडत त्यांनी वसंत मोरेंच्या वक्तव्यावर फारसं भाष्य करणं टाळलं.

ADVERTISEMENT

मी पक्षातील दहशतवादी आहे का? राज ठाकरेंकडे किती तक्रारी करायच्या? वसंत मोरे भडकले

यामुळे आता वसंत मोरे हे मनसेला जय महाराष्ट्र करणार की, मनसेच वसंत मोरेंना बाहेरचा रस्ता दाखवणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT