माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा; आपण कशाला घाबरायचं? – मुंबईतून Pankaja Munde यांची टोलेबाजी
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांची समजतून काढताना पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत जोरदार बॅटींग केली. आपल्या कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत पंकजा मुंडेंनी राज्यातील भाजप नेतृत्वालाही टोले लगावले आहेत. “आपण आपलं घर कशाला सोडायचं, ज्यावेळी छत अंगावर पडेल त्यावेळी पाहू. माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा. आपण कशाला […]
ADVERTISEMENT
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांची समजतून काढताना पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत जोरदार बॅटींग केली. आपल्या कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत पंकजा मुंडेंनी राज्यातील भाजप नेतृत्वालाही टोले लगावले आहेत.
ADVERTISEMENT
“आपण आपलं घर कशाला सोडायचं, ज्यावेळी छत अंगावर पडेल त्यावेळी पाहू. माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा. आपण कशाला घाबरायचं?” असं म्हणत पंकजा मुंडेंनी राज्य नेतृत्वाला सुनावलं आहे. मला संपवण्याचा प्रयत्न झाला असला तरीही मी संपले नाही. माझ्या प्रवासाला एक स्वल्पविराम द्यावा, बाकीचं केंद्रीय नेतृत्वावर सोडा. त्यांचं काहीतरी वेगळं नियोजन असेल. मला ज्यादिवशी वाटेल की इथे राम नाही, त्यावेळी बघू. मला माझं घर सोडायचं नाही असंही पंकडा मुंडे म्हणाल्या.
‘शक्य असेल तोपर्यंत धर्मयुद्ध टाळणार’, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना Pankaja Munde यांचा इशारा
हे वाचलं का?
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी नाकारुन भाजप ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतोय. परंतू प्रीतम मुंडे म्हणजे माझा परिवार नाही, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता देखील माझा परिवार आहे. “तुम्ही नाराज झाल्याचं मी दिल्लीत नड्डा साहेबांना सांगितलं, त्यावेळी त्यांनी मला तुम्ही त्यांची समजूत काढा असं म्हणत विश्वास दाखवला.”
ADVERTISEMENT
आपल्याच समाजातील एक नेता जर मंत्रीपदापर्यंत पोहचत असेल तर मी त्याला का थांबवू. मुंडे साहेबांच्या प्रयत्नामुळे या राज्यातला तळागाळातला माणूस राजकारणात पदावर येऊन निवडायला लागला. वयाने मोठ्या व्यक्तीचा मी कधीच अपमान केला नाही आणि करणारही नाही. तसे माझ्यावर संस्कारच झाले नाहीत, असं म्हणत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांनी आपली एकजूट कायम ठेवायला सांगितली.
ADVERTISEMENT
Pankaja Munde यांचं दबावतंत्र नाही, त्या वेगळा निर्णय घेणार नाहीत – BJP नेत्यांचं स्पष्टीकरण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT