बंडखोर आमदार प्रकाश आबिटकरांच्या घरावर मोर्चा; शिवसैनिक-पोलिसांमध्ये जोरदार झटापट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सुर्यवंशी

ADVERTISEMENT

कोल्हापूर: शिवसेनेचे फुटीर आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांच्या घरावर आज शिवसैनिकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले आहे. त्यामुळे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar), विजय देवणे, यांच्यासह युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख, सुयोग पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले, राधानगरी भूदरगडचे शिवसेना, आमदार प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आबिटकर यांना गद्दार म्हणून त्यांचा निषेध करत शिवसैनिकांनी, आज गारगोटीत त्यांच्या घरावर मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासून शहरात प्रचंड बंदोबस्त लावला होता.

हे वाचलं का?

यावेळी, क्रांती चौकात, आबिटकर यांच्याविरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी आबिटकर यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. तसेच अजून वेळ गेली नाही. त्यामुळे वेळीच शिवसेनेत परत यावे असे आवाहनही करण्यात आले. निदर्शनानंतर, शिवसैनिक आबिटकर यांच्या घराकडे निघाले असता, पोलिसांनी त्यांना बॅरिकेट्स लावून रस्त्यात अडवले. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलनकर्ते शिवसैनिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ३९ शिवसेनेच्या आणि काही अपक्ष आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले आहे. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. त्यानंतर शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात काय घडामोडी घडतात हे सांगणं सध्यातरी कठीण दिसत आहे. बंडखोर आमदार आज गोव्यामध्ये येणार आहेत, त्यानंतर ते उद्या फ्लोअर टेस्टसाठी विधानभवनात दाखल होतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT