मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा उंच बिल्डींगमध्ये रुग्णसंख्या जास्त – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा बंगल्यावर बैठक पार पडणार आहे, ज्यात राज्यात निर्बंध लादण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याआधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शहरात निर्बंध लादले जाणार असल्याचे संकेत दिले होते. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना किशोरी पेडणेकर यांनी शहरातील झोपडपट्ट्यांपेक्षा उंच इमारतींमध्ये रुग्ण जास्त वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

मुंबईतल्या टोलेजंग इमारतींमध्ये होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार, आतापर्यंत ६५० बिल्डींग सील

“मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा उंच इमारतींमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. वरळी, धारावीसारख्या भागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे, कारण तिकडे लोकांनी जागरुकता दाखवली. परंतू सोसायट्यांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना एंट्री दिली जात नाहीये”, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या शहरात सापडत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे सोसायट्यांमधून येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली होती.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती, एक खास रिपोर्ट

यावेळी बोलत असताना किशोरी पेडणेकर यांनी शहरातील मंदीर, मशिदी, गुरुद्वारा १५ दिवस किंवा एका महिन्यासाठी बंद करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिका जनतेच्या हिताचाच निर्णय घेत असल्याचं सांगितलं. तसेच मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत असताना बेड्सची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर बेड्स कमी होत आहेत. शहरातील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या वाढवण्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

गुरुवारी शहरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात दररोज कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबई शहरातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाचे पेशंट आढळल्यामुळे आतापर्यंत शहरात ६५० इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश रुग्ण हे टोलेजंग इमारतींमधून येत आहेत. अशा सोसायट्यांमध्ये नियमांचं कडक पालन करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

कोरोना रुग्णसंख्येचा वाढता कहर, एप्रिलमध्ये आता सुट्टीच्या दिवशीही होणार लसीकरण

एका सोसायटीत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील केली जात आहे. आतापर्यंत मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची आकडेवारी –

  • २९ मार्च – ५७८ सोसायटी

  • ३० मार्च – ६०२ सोसायटी

  • ३१ मार्च – ६१६ सोसायटी

  • १ एप्रिल – ६५० सोसायटी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT