मुंबई-पुण्यात थोडा दिलासा! दिवसभरात Corona पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे झालेले रूग्ण जास्त
मुंबईत दिवसभरात 4 हजार 14 रूग्ण प़ॉझिटिव्ह आढळले आहेत. तर पुण्यात दिवसभरात 3 हजार 871 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुण्यात दिवसभरात 6 हजार 159 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर मुंबईत 8 हजार 240 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा डबलिंग रेट हा 68 दिवसांवर गेला आहे. दोन्ही शहरांमध्ये कोरोना मुक्त झालेले रूग्ण जास्त […]
ADVERTISEMENT
मुंबईत दिवसभरात 4 हजार 14 रूग्ण प़ॉझिटिव्ह आढळले आहेत. तर पुण्यात दिवसभरात 3 हजार 871 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुण्यात दिवसभरात 6 हजार 159 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर मुंबईत 8 हजार 240 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा डबलिंग रेट हा 68 दिवसांवर गेला आहे. दोन्ही शहरांमध्ये कोरोना मुक्त झालेले रूग्ण जास्त आहे हा त्यातल्या त्यात दिलासा आहे असंच म्हणावं लागेल.
ADVERTISEMENT
पुण्यात दिवसभरात 57 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर मुंबईत 59 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे.मुंबईत आत्तापर्यंत 20 लाख 66 हजार 813 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत 53 लाख 2 लाख 498 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण 12 हजार 912 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात आत्तापर्यंत एकूण 6611 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
हे वाचलं का?
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा देशाच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वाधिक बसला आहे. अशात महाराष्ट्रात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि लसींची कमतरता भासते आहे. कोरोनाची दुसरी लाट ही सर्वाधिक संसर्ग पसरवणारी ठरली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनही लावण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधाचे नियम लोकांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर राज्यात तिसरी लाटही येऊ शकते असं टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं आहे.
महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या कठोर निर्बंधांची मुदत 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपते आहे. त्याआधी राज्यातला लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना म्हणावा तसा नियंत्रणात आलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 10 पेक्षा जास्त आहे. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 25 हून अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणखी किमान 15 दिवस कठोर निर्बंध लावण्याचीही शक्यता आहे. त्याची घोषणाही लवकरच केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
‘1 मे रोजी लसीच उपलब्ध झाल्या नाहीत तर…’ राजेश टोपे म्हणतात
लसीकरणाबाबत काय?
1 मेपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू होणार आहे. केंद्र सरकारने तशी मुभा दिली आहे. मुंबईत 18 ते 44 वर्षे या वयोगटातील लोकांना मोफत लस मिळणार नाही. त्यांनी खासगी केंद्रांवर किंवा रूग्णालयांमध्ये नोंदणी करायची आहे असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईत 18 वर्षे ते 44 या वयोगटाला लस मोफत मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होणार याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT