महाराष्ट्रात दिवसभरात 21 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 95 टक्के

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 21 हजार 776 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.01 टक्के एवढा झाला आहे. तर आज राज्यात 13 हजार 659 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 300 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.71 टक्के एवढा आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 62 लाख 71 हजार 483 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 19 हजार 224 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 52 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 7 हजार 93 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला एकूण 1 लाख 88 हजार 27 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात 13 हजार 659 नवीन रूग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 58 लाख 19 हजार 224 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 300 मृत्यूंपैकी 211 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 89 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 441 ने वाढली आहे. हे 441 मृत्यू, नागपूर-62, यवतमाळ-46, सातारा-44, नाशिक-36, पुणे-34, अहमदनगर-32, ठाणे-31, रायगड-27, उस्मानाबाद-17, लातूर-14, औरंगाबाद-13, गडचिरोली-13, हिंगोली-12, रत्नागिरी-12, कोल्हापूर-10, गोंदिया-9, सांगली-8, चंद्रपूर-4, नंदूरबार-4, सिंधुदुर्ग-3, सोलापूर-3, वाशिम-2, बीड-1, बुलढाणा-1, नांदेड-1, परभणी-1 आणि वर्धा-1 असे आहेत.

हे वाचलं का?

मुंबईत खासगी हॉस्पिटल सोसायट्यांमध्ये करणार लसीकरण

दहा हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण असलेली शहरं

ADVERTISEMENT

मुंबई -18 हजार 118

ADVERTISEMENT

ठाणे- 16 हजार 801

पुणे-22 हजार 280

सातारा-15 हजार 246

सांगली- 10 हजार 288

कोल्हापूर- 18 हजार 130

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT