महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 67 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 410 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 63 लाख 24 हजार 720 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.8 टक्के इतके झाले आहेत. आज राज्यात दिवसभरात 3586 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 410 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 63 लाख 24 हजार 720 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.8 टक्के इतके झाले आहेत. आज राज्यात दिवसभरात 3586 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 67 लाख 9 हजार 128 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 15 हजार 111 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 81 हजार 72 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1813 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 48 हजार 451 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3586 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,15,111 इतकी झाली आहे.
Pm Narendra Modi यांच्या वाढदिवशी देशभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्ण










