महाराष्ट्रात दिवसभरात 47 हजारांहून जास्त रूग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 91 टक्के

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 47 हजार 371 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 50 लाख 26 हजार 308 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 91.43 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 29 हजार 911 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात 738 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 21 लाख 24 हजार 275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 97 हजार 448 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29 लाख 35 हजार 409 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 21 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 3 लाख 83 हजार 253 रूग्ण सक्रिय आहेत.

४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, महाराष्ट्रातलं हे गाव ठरतंय देशासाठी आदर्श

हे वाचलं का?

आज राज्यात 29 हजार 911 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 54 लाख 97 हजार 448 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 738 मृत्यूंपैकी 429 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 309 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यातील कोव्हिड 19 आकडेवारीचे दिनांक 13 मे 2021 पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्यातील मृत रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

मुंबई- 28 हजार 987

ठाणे- 27 हजार 604

पुणे- 64 हजार 84

सातारा- 18 हजार 942

सांगली- 16 हजार 923

कोल्हापूर- 14 हजार 232

सोलापूर- 19 हजार 783

नाशिक- 18 हजार 151

अहमदनगर- 18 हजार 976

बीड- 10 हजार 463

अमरावती – 10 हजार 685

नागपूर 19 हजार 615

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT