Maharashtra: दिवसभरात 66 हजारांहून जास्त पॉझिटिव्ह,सर्वाधिक 895 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 66 हजार 358 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 67 हजार 752 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 36 लाख 69 हजार 548 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज दिवसभरात 895 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ही संख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. राज्यातला मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 62 लाख 54 हजार 737 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44 लाख 10 हजार 85 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42 हजार 64 हजार 936 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 30 हजार 146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात आज घडीला 6 लाख 72 हजार 434 सक्रिय रूग्ण आहेत. दिवसभरात 66 हजार 358 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रूग्णांची संख्या 44 लाख 10 हजार 85 इतकी झाली आहे.

‘1 मे रोजी लसीच उपलब्ध झाल्या नाहीत तर…’ राजेश टोपे म्हणतात

ADVERTISEMENT

दिवसभरात नोंद झालेल्या 895 मृत्यूंपैकी 392 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. तर 179 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 324 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू औरंगाबाद 139, पुणे 58, नाशिक 36, नागपूर 20, गडचिरोली 14, अहमदनगर 10, ठाणे 10, नांदेड 6, यवतमाळ 6, बुलढाणा 5, चंद्रपूर 3, परभणी 3, भंडारा 2, नंदुरबार 2, सोलापूर 2, वाशिम 2, बीड 1, जळगाव 1, उस्मानाबाद 1, रायगड 1, सांगली 1 आणि सिंधुदुर्ग 1 असे आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई-68 हजार 603

ठाणे- 72 हजार 302

पालघर-16 हजार 302

रायगड- 13 हजार 310

पुणे- 1 लाख 4 हजार 561

सातारा- 16 हजार 942

सांगली- 11 हजार 750

सोलापूर-15 हजार 103

नाशिक-51 हजार 61

अहमदनगर-21 हजार 151

जळगाव-13 हजार 68

औरंगाबाद-13 हजार 993

बीड- 10 हजार 914

लातूर-13 हजार 197

परभणी- 12 हजार 176

नांदेड- 10 हजार 635

यवतमाळ- 11 हजार 730

नागपूर- 75 हजार 219

भंडारा – 12 हजार 399

चंद्रपूर – 25 हजार 320

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाहिली तर लक्षात येतं की पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. 1 लाखांहून जास्त अॅक्टिव्ह केसेस पुण्यात आहेत त्यानंतर नागपुरात अॅक्टिव्ह केसेस 75 हजारांपेक्षा जास्त, ठाण्यात 72 हजारांहून जास्त तर मुंबईत 68 हजारांहून अधिक रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT