महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण झाले बरे, मृत्यूदर 2 टक्के
महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 317 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 95.93 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत राज्यातल्या एकूण कोरोना रूग्णांची संख्या 60 लाख 7 हजार 431 इतकी […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 317 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 95.93 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत राज्यातल्या एकूण कोरोना रूग्णांची संख्या 60 लाख 7 हजार 431 इतकी झाली आहे.
ADVERTISEMENT
उंदराने डोळे कुरतडलेल्या Rajawadi Hospital मधील ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू
मृत्यूदराने वाढवली चिंता
हे वाचलं का?
महाराष्ट्रात दिवसभरात 197 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्याचा मृत्यू दर हा 2 टक्के झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 859 रूग्णांचा कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. गुरूवारी जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्यामध्ये इतक्या दिवसात पहिल्यांदाच मृत्यूदर हा 2 टक्के झाला असल्याचं पाहण्यास मिळालं आहे. आत्तापर्यंत 1.80 ते 1.90 टक्के या प्रमाणात हा दर होता जो आता थेट 2 टक्के इतका झाला आहे. अशातच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनेही राज्याची चिंता वाढवली आहे. राज्यात आत्तापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एकही मृत्यू झालेला नाही. मात्र येत्या काळात असं काही घडलं तर चिंता आणखी नक्की वाढणार आहे.
आज दिवसभरात 9 हजार 844 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रूग्णांची संख्या आता 60 लाख 7 हजार 431 इतकी झाली आहे. एकीकडे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढतो आहे ही बाब समाधानाची असली तरीही मृत्यूदर 2 टक्के होणं ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी ठरते आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण
ADVERTISEMENT
मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या संख्येनुसार शहरात आज दिवसभरात 789 नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण करोनाबाधितांची संख्या 7 लाख 24 हजार 113 झाली आहे. मुंबईत आज दिवसभरात 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 91 हजार 670 इतकी आहे. मुंबईत दिवसभरात 10 मृत्यूंची नोंद जाली आहे. मृत्यूंची नोंद मुंबईतही दोन अंकी झाली आहे त्यामुळे चिंता वाढली आहे यात शंकाच नाही. मुंबईत आत्तापर्यंत 15 हजारांहून अधिक कोव्हिड रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT