कुणी व्हॅक्सिन देता का व्हॅक्सिन? मुंबईत अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद
मुंबईत व्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतो आहे. मुंबईतील 73 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 37 लसीकरण केंद्रं सुरू आहेत. आम्हाला लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण केंद्रांवरचं लसीकरण थांबवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. लस मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बहुतांश लसीकरण केंद्रांवर लस पुरवठा न झाल्याने तेथील लसीकरण थांबवण्यात […]
ADVERTISEMENT
मुंबईत व्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतो आहे. मुंबईतील 73 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 37 लसीकरण केंद्रं सुरू आहेत. आम्हाला लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण केंद्रांवरचं लसीकरण थांबवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. लस मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बहुतांश लसीकरण केंद्रांवर लस पुरवठा न झाल्याने तेथील लसीकरण थांबवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
मुंबईतील 73 लसीकरण केंद्रांपैकी बहुतांश लसीकर केंद्रांवर लसच उपलब्ध नाही त्यामुळे त्या ठिकाणी सुरू असलेलं लसीकरण थांबवण्यात आलं आहे. आज घडीला फक्त 37 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यांच्याकडेही लसींचा मर्यादित साठा आहे. फक्त नोंदणी केलेल्या लोकांनाच या ठिकाणी लस देण्यात येते आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा दुसरा डोस घ्यायचा आहे. मात्र तो घेता येत नसल्याने आणि लसी उपलब्ध नसल्याने त्यांनी राग व्यक्त केला आहे. लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नाही हे आम्हाला आधी का कळवण्यात आलं नाही? असाही प्रश्न विचारण्यात येतो आहे.
हे वाचलं का?
COVAXIN लसीची किंमत जाहीर, जाणून घ्या काय आहे किंमत?
अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी लांबून येत आहेत. मात्र लस उपलब्ध नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. लसीकरण केंद्रांवर लस नाही आणि ते कळवण्यातही आलेलं नाही या व्यवस्थेवर अनेकांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. एवढंच नाही अनेक नागरिक खासगी हॉस्पिटल्समध्ये ज्या लसींच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत त्यावरही नाखुष आहेत. आमच्याकडे इतके पैसे नसतील तर आम्ही लस घ्यायची नाही का? असाही प्रश्न काही लोकांनी विचारला आहे. एवढंच नाही तर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आता कळकळीची विनंती केली आहे की लवकरात लवकर लसी पुरवा जेणेकरून आम्हाला आमची लस घेता येईल.
ADVERTISEMENT
आधी लांब रांग लावायची आणि नंतर लस उपलब्ध नाही म्हणून निघून जायचं असं चित्र मुंबईत ठिकठिकाणी पाहण्यास मिळतं आहे. बीकेसी या ठिकाणी असलेलं मोठं लसीकरण केंद्रही बंद झालं आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळावा म्हणून केंद्र सरकारचे पाय धरायलाही तयार -राजेश टोपे
महाराष्ट्राला ऑक्सिजन, लसी आणि रेमडेसिवीर या तिन्हींचा पुरवठा कमी पडतो आहे. त्यामुळे तो करण्यात यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमधल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसंच राजेश टोपे यांनीही लसी, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आम्ही प्रसंगी केंद्राचे पाय धरायलाही तयार आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत राज्याला केंद्राच्या मदतीची अपेक्षा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT