Movad Flood ला 30 वर्ष पूर्ण, महापुरामुळे 204 गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी
योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर मोवाड येथे ३० जुलै ( सन १९९१ ) च्या पहाटे मोवाडपासून तर उतारा उतारा या गावापर्यंत वर्धा नदीने रौद्ररूप धारण केले होते. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापूराने असंख्य वेदना देत आजही आठवणी कायम आहे. एकमेकांना कवेत घेत होत्याचे नव्हते झाले. नदीच्या काठावरील 12 गावांसाठी वर्धा नदी […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर
ADVERTISEMENT
मोवाड येथे ३० जुलै ( सन १९९१ ) च्या पहाटे मोवाडपासून तर उतारा उतारा या गावापर्यंत वर्धा नदीने रौद्ररूप धारण केले होते. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापूराने असंख्य वेदना देत आजही आठवणी कायम आहे. एकमेकांना कवेत घेत होत्याचे नव्हते झाले. नदीच्या काठावरील 12 गावांसाठी वर्धा नदी कोपली होती. तिने मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला 30 वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काट्याचे शहारे उभे राहतात.
30 वर्षा अगोदर महापूराच्या पाण्याने लोकांना मारले आणि आता तहानलेले मोवाडवासी व्याकूळ होत आहे. त्यानंतर कधी महापूर आलाच नाही. दरवर्षी प्रमाने या वर्षी सुध्दा मोवाडवासी नागरिक ३० जुलै हा जखमेचा काळा दिवस म्हणून पाळतात. व्यापारी दुकाने बंद ठेवतात. प्रत्येक घरचा नागरिक श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जातात. या महापूरानंतर मोवाड गाव सावरले तरी शासकीय यंत्रणेच्या अपयश पावलो पावली जानवते. त्यामुळे गावाचे गावपण यायला पुन्हा किती दिवस वाट बघावी लागेल. या आशेवर येथील प्रत्येक नागरिक वाट बघत आहे. मोवाडवासी सावरले नाहीत. ३० जुलै १९९१ च्या घटनेला ३० वर्षे पूर्ण होत आहे. परंतु महापूराच्या धक्क्याने आजपर्यत मोवाडवासी सावरले नाही.
हे वाचलं का?
विणकरांच्या व्यवसायाला भरभराट आणण्यासाठी गेल्या २९ वर्षात प्रयत्न झाले नाही. केवळ खोटी अश्वासने देऊन मतांचा जोगवा मागण्याचे काम प्रामुख्याने करण्यात येऊन विणकरांच्या तोंडाला पाने पुसली जातात. मोवाड बाजारपेठेची ख्याती कायमची पुसली गेली. वरोजगारही नष्ट झाले. रोजगारासाठी येथील शिक्षित तरुण शहराकडे भटकंती करीत असल्याचे विदारक चित्र आहे. रोजगारासाठी बेरोजगार गावाला रामराम ठोकत आहे.
ADVERTISEMENT
परत येईल का मोवाड चे वैभव ?
ADVERTISEMENT
मोवाड हे गाव महाराष्टाच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेलं आहे. मोवाड नगर परिषद ची स्थापना १७ मे १८६७ ला झाली. त्याला १५४ वर्षे पूर्ण झाली. येथील नगरपरिषद , स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास , चलेजाव आंदोलन खुप प्रसिद्ध होत. मोवाडचा बैलबाजार , संत्रा उत्पादन , कापूस मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे. लोक सुखी व समृद्धी होते. मोवाड हे दळणवळणाच्या साधनापासून एकट पडल्याने मागे पडले. हातमाग व्यवसाय बंद पडल्यामुळे शेती व्यवसायावर अबलंबून आहे.
तरूणांचे स्थलांतरण ;
गावामध्ये उच्च शिक्षणाच्या सोयी पुरेशी नसल्यामुळे पूर्वी ११ हजार लोकसंख्येचे शहर जवळपास ९ हजारांवर येऊन पोहचले. शिक्षण प्रगतीशील येथील गंगाराम भगवान हायस्कूल जुनी शाळा आहे. येथून दरवर्षी दहावी व बारावीला दरवर्षी चार – पाच विद्यार्थी मेरिटमध्ये असायचे. तेव्हा मोवाडचा समृध्द इतिहास होता. विद्यापिठाचे कुलगुरु मोवाड शहाराचे एकेकाळचे स्वच्छतादूत येथील मुळचे डॉ. सुभाष पुरी हे राहुरी विद्यापीठाचे कुलगुरु होते. ते आता निवृत्त झाले. त्यांची मोवाड नगरपरिषदेने स्वच्छतादूत म्हणून निवड केली होती.
सध्याचे मोवाड
मोवाड येथील शेतकऱ्यान जवळ महापूराच्या पूर्वी जवळपास १ हजार ६५० एकर जमीन होती. महापूरामध्ये जवळपास ६५० एकर जमीन खरडल्या गेली. आता ती पडीक आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या शेतीचा मोबदला मिळाला नाही याची शोकांतीका आहे. ४०० एकर मध्ये गावाचे पुनर्वसन झाले. ३५०.एकर जमीन रेल्वेमार्गात गेली. वर्धानदी जिवनदामीनी होती. गावाशेजारा हुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग हुकला. कुठलाही ठोस रोजगार नसल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. रोजगारासाठी कुठलेही उद्योग नाही.
मोवाडवासी पाळणार काळा दिवस
महापूरामुळे जीवनाची घडी बिस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येते. या विनाशाला तब्बल ३० वर्षे पूर्ण होत असल्याने काळाची झडप मोवाड वासीयांनवर आली. निष्पाप २०४ लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून ३० जुलै रोज शुक्रवार काळा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. ती काळरात्र वैऱ्याची ठरली. मृतदेहाचा सडा तीन – चार किलोमिटर पर्यत पडला होता. प्राणहाणी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. आरडा ओरड किंकाळ्या आकाशापर्यंत गेल्या होत्या. क्षणात संपूर्ण गाव नेस्तानाबूत झाले. मृतांच्या नातेवाईकांना २५ हजार तात्पूर्ती रक्कम देण्यात आली. आज मात्र लाखो रुपये दिले जातात. ही रक्कम म्हणजे शासनाचा भेदभाव अशी नाराजी नागरिकांनमध्ये दिसते. ” मोवाड हे सोन्याचे कवाड “हे गत वैभव परत येईल का ?
शहीद पोलीसांचे पुतळे जागवत आहेत आठवणी
३० जुलै १९९१ च्या महापूरात गावकऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष पोलीस जमादार समाधन इंगळे , वामनराव मेंढे हे कर्तव्य बजावत असतांना लोकांना सुरक्षित जागी नेत असतांना त्यांना मृत कवटाळले. त्यांना सुध्दा जलसमाधी मिळाली. आता फक्त पोलीस ठाण्याच्या प्राणंगात त्यांचे पुतळे आठवणी देत आहे.परंतु त्यांच्या पुतळ्यावर पक्षी बसतात. त्यावर गेल्या २९ वर्षात छत सुध्दा टाकण्यात आले नाहीत. तसेच त्या पुतळ्या संभोवता कठडे बांधून साधी डागडुजी पोलीस प्रशासन व शासन करित नाही. फक्त श्रध्दांजली वाहण्याचे काम केले जाते.
३० वर्षा नंतर ही मोवाड नगरीत हवी असलेली विकासकामे झालीच नाही
शहरात रोजगाराच्या दृष्टीने कारंजा – तिगाव राष्ट्रीय महामार्ग गेल्यास शहरातील युवकांना स्वंयम रोजगाराची निर्मीती होऊ शकते.
वर्धा नदीवर सिंचनाच्या दृष्टीने मोठ्या बंधाऱ्याची निर्माण करण्यात यावे जेणे करून शेतकऱ्यांना शेती साठी मुलभुत पाणी उपलब्ध होईल.
मोवाड शहरात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्या दृष्टिकोनातून शहरात कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस ची निर्मीती करण्यात यावे. जेणे करून शेतकऱ्यांना आपला शेती माल स्टोरेज करून ठेवता येईल.
३० जुलै १९९१ च्या नंतर शहराचे पुणरवसन करण्यात आले. मात्र जुन्या मोवाड शहराचे सौंदर्यकरीकरण करून तेथे पर्यटनाच्या दृष्टीने वाटरपार्क तयार करण्यात यावे. त्या माध्यमातून शहराला एक नव पर्यटनाची चालना मिळेल.
शहरात आरोग्याच्या दृष्टीने मुलभुत सोय उपलब्ध करण्यात यावी. मोवाड पासून नागपूर – अमरावती हे अंतर १०० किमी पडतो . अश्या वेळी मोवाड शहरात आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्यापूर्ण ग्रामीण रूग्णालय तयार करण्यात यावे.
शहरात एके काळी चांगल्या शिक्षणाच्या सोयी होत्या . पण महापूरानंतर शिक्षणाचे तिन तेरा वाजले. शहरातील नागरिक पुराच्या धक्याने अजून पर्यत सावरले नाही. शहरातील युवकांना शिक्षणासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यासाठी त्यांना अमाप पैसे मोजावे लागते. शहरात विज्ञान शाखा , एम.ए , बि.कॉम , सह आय. टी आय सारखे शिक्षण उपलब्ध व्हावे.
शहरात दररोज १३ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. पण मात्र संपूर्ण पाणी बोरवेल चे असून १२०० ते १४०० फुटावरचे असल्याने क्षाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात किडणी स्टोनचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहे. शहरात वॉटर फिल्टर ची व्यवस्था करण्यात यावी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT