MPSC Exam : मुंबईत परीक्षा केंद्र असलेल्यांना दिलासा; ‘लोकल’ने करता येणार प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवले असले, तरी लोकलने प्रवास करण्यासंदर्भातील बंधन कायम आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि 14 दिवसांचा कालावधी झालेल्यांच लोकलमधून प्रवास करता येत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या आणि मुंबईत परीक्षा केंद्र असलेल्या उमेदवारांना जिकरीचं ठरणार होतं. मात्र सरकारने उमेदवारांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज आणि उद्या (30 व 31 ऑक्टोबर) लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असं पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आलं होतं. त्यानंतर रेल्वे विभागाने प्रवास करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करावा लागणार असून, त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षेसाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असं म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

28 ऑक्टोबरपासून ट्रेन सेवा 100 टक्के क्षमतेने, SOP नुसार प्रवास करण्याची संमती

त्याचप्रमाणे ‘एम एस इनोव्हेटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हेही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरिता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे उमेदवारांना लोकल रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT