मुंबईत कोरोनाची तिसरी आटोक्यात! दिवसभरात ५ हजार रुग्ण परतले घरी, १० रुग्णांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याची परिस्थिती घटत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला धडकलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला महिन्या अखेरीस ओहोटी लागली असून, २४ तासांत १,३१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत मागील २४ तासांत रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गुरुवारी (२७ जानेवारी) […]
ADVERTISEMENT
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याची परिस्थिती घटत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला धडकलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला महिन्या अखेरीस ओहोटी लागली असून, २४ तासांत १,३१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत मागील २४ तासांत रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गुरुवारी (२७ जानेवारी) मुंबईत १,३८४ रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत आणखी घट झाली असून, आज १,३१२ रुग्ण आढळले आहेत. यात लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या १,०८९ इतकी आहे म्हणजेच २४ तासांत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ८३ टक्के रुग्णांना लक्षणं नाहीत.
ब्लॅक फंगस पुन्हा डोकं वर काढणार? मुंबईत पहिला रूग्ण आढळल्यानंतर काय म्हणत आहेत तज्ज्ञ?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी १९३ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, ४१ जणांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत ३७ हजार ५७५ बेड असून, त्यापैकी २ हजार ६५२ बेडवर रुग्णांना भरती करण्यात आलेलं आहे.
दिलासादायक बाब म्हणजे २४ तासांत ४ हजार ९९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण कोरोना मृतांची संख्या १६,५९१ वर पोहोचली आहेत. मुबईतील रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्ही रेट ०.२७ टक्के इतका आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २७,७२० चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
Corona Test नंतर रिपोर्ट निगेटिव्ह असला तर कोणता कोरोना झालाय?
ADVERTISEMENT
दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याने मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला असून, २५९ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत एकही सक्रीय कंटेनमेंट झोन नसून, सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्याही २० इतकी आहे. मागील २४ तासांत कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ हजार ९४९ जणांचा शोध घेण्यात आला.
Covid 19: कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट किती तास जगू शकतो?
#CoronavirusUpdates
28th January, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 1312
Discharged Pts. (24 hrs) – 4990Total Recovered Pts. – 10,09,374
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 14344
Doubling Rate – 259 Days
Growth Rate (21 Jan – 27 Jan)- 0.27%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 28, 2022
१० दहा दिवसांत आढळून आलेले रुग्ण (कंसात चाचण्या)
१९ जानेवारी – ६,०३२ (६०,२९१)
२० जानेवारी – ५,७०८ (५३,२०३)
२१ जानेवारी – ५,००८ (५०,०३२)
२२ जानेवारी – ३,५६८ (४९,८९५)
२३ जानेवारी – २,५५० (४५,९९३)
२४ जानेवारी – १,८५७ (३४,३०१)
२५ जानेवारी – १,८१५ (३४,४२७)
२६ जानेवारी – १,८५८ (४२,३१५)
२७ जानेवारी – १,३८४ (४२,५७०)
२८ जानेवारी – १,३१२ (२७,७२०)
ADVERTISEMENT