शरद पवारांना धमकी देणारा पुण्यात राहिला; बायकोने दुसऱ्यासोबत लग्न केलं त्यामुळेच…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. नारायण कुमार सोनी असं संशयिताचं नाव असून तो विक्षिप्त असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच मागील ४ ते ५ महिन्यांपासून तोच धमकी देणारे फोन करतं असल्याचंही तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या […]
ADVERTISEMENT
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. नारायण कुमार सोनी असं संशयिताचं नाव असून तो विक्षिप्त असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच मागील ४ ते ५ महिन्यांपासून तोच धमकी देणारे फोन करतं असल्याचंही तपासात समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नारायण सोनी सध्या बिहारमधील रहिवासी असून तो यापूर्वी पुण्यात १० वर्ष वास्तव्याला होता. या दरम्यानच्या काळात त्याच्या पत्नीने त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. शरद पवार यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याचा राग मनात धरुन त्याने पवारांना धमकी दिली होती.
शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी काल (मंगळवारी) फोन करून धमकी देण्यात आली होती. मुंबईत येऊन हत्या करेन, मुंबईत येऊन गावठी कट्ट्याने जीवे मारू, अशी धमकी त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने धमकी दिली, ती व्यक्ती हिंदीतून बोलत होती.
हे वाचलं का?
दरम्यान, शरद पवार यांनी नुकतीच वयाची ८२ वर्ष पूर्ण केली. १२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा झाला. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परंतु आता ही धमकी देणारा गजाआड झाला असून तो विक्षिप्त असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT