आर्यन खानला आज जामीन मिळणार की नाही?, कोर्टाच्या निकालाकडे अवघ्या बॉलिवूडचं लक्ष
मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Mumbai cruise drugs case) तुरुंगात असलेल्या आर्यन खानची (Aryan Khan) तुरुंगातून सुटका होणार की नाही हे आज (20 ऑक्टोबर) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण, आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. गेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. शाहरुख खानचा मुलगा […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Mumbai cruise drugs case) तुरुंगात असलेल्या आर्यन खानची (Aryan Khan) तुरुंगातून सुटका होणार की नाही हे आज (20 ऑक्टोबर) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण, आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
गेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन व्यतिरिक्त अरबाज आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावरही निर्णय सुनावला जाणार आहे.
कोर्ट निवडू शकतं ‘हे’ तीन पर्याय
हे वाचलं का?
दरम्यान, आज न्यायालय तीन पर्यायांपैकी एक निवडू शकते. एक म्हणजे आर्यनला जामीन मिळू शकतो. दुसरा म्हणजे निर्णय तयार नसल्यास त्याला सुनावणीची नवीन तारीख मिळू शकते. असे झाल्यास आर्यन तुरुंगातच राहील.
तिसरा पर्याय म्हणजे आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला जाऊ शकतो. तसं झाल्यास आर्यनचे वकील हे मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकतात. या परिस्थितीतही आर्यनला तुरुंगात राहावे लागेल. त्यामुळे आर्यनच्या बाबतीत कोर्ट नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
कोर्टाने नेमंक काय म्हटलं होतं?
ADVERTISEMENT
दुसरीकडे आर्यन खान याच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने आर्यनसह इतर आरोपींचा जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. यावेळी कोर्टाने असं म्हटलं होतं की, ‘शक्य झाल्यास आम्ही 20 तारखेला निर्णय जाहीर करु. परंतु सध्या तरी आम्ही कामकाजात फार व्यस्त आहोत. मात्र, तरीही या प्रकरणी आम्ही 20 तारखेलाच निर्णय देण्याचा संपूर्ण प्रयत्न करु.’ त्यामुळे नेमका निकाल काय येईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आर्यन खान अटकेचं नेमकं प्रकरण काय?
आर्यन खान हा मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळावा म्हणून त्याचे वडील शाहरुख खान यांनी दिग्गज वकिलांची फौज कोर्टात उभी केली आहे. मात्र, असं असलं तरीही आर्यनला अद्यापही जामीन मिळू शकलेला नाही.
काही दिवसांपूर्वी आर्यन खान याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून आर्यन हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच आहे. NCB ने ड्रग्स प्रकरणात ही कारवाई केली होती.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकून NCB ने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह इतरांना अटक केली होती. ज्यांना सुरुवातीला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी आर्यन खानच्या वकिलांनी सतीश मानेशिंदे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. याबाबत आतापर्यंत अनेक सुनावण्या पार पडल्या आहेत. पण आर्यनची अद्यापही सुटका होऊ शकलेली नाही.
एनसीबी देखील सातत्याने नवनवे दावे करुन आर्यनला ड्रग्स प्रकरणात जामीन मिळू नये यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. जर आर्यन खानला आज जामीन मंजूर झाला तर त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, तसं न झाल्यास आर्यनच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
Exclusive : सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, आर्यन खान तुरुंगात झालाय डिस्टर्ब
आर्यन ड्रग्स पेडलरच्या संपर्कात असल्याचा NCB चा आरोप
एनसीबीने या प्रकरणातील आर्यन, अरबाज मर्चंट आणि इतर आरोपींचे फोन जप्त केले होते आणि त्यांचे सर्व चॅट्स तपासले होते. त्या तपासात आर्यन अनेक ड्रग पेडलर आणि ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात असल्याचं NCB कडून सांगण्यात येत आहे. त्या पुराव्याच्या आधारावर, NCB ने आर्यनवर खटला दाखल केला आहे. हेच चॅट्स NCB ने पुरावे म्हणून कोर्टात सादर केले असल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT