Mumbai Local Train: मुंबई लोकलचा पास कसा मिळवाल?, पाहा रेल्वे प्रवासासाठी नेमके नियम काय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट झाल्यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याचवेळी मुंबईतील लोकल सेवा ही सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. पण आज (8 ऑगस्ट) केलेल्या संबोधनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, असं असलं तरीही मुंबईतील लोकल प्रवास हा सर्वांसाठी सरसकट सुरु करण्यात येणार नाही. कारण लोकल प्रवासासाठी काही नियम तयार करण्यात आले आहे. ते नियम पाळूनच मुंबईत लोकल प्रवास करता येणार आहे.

जाणून घ्या लोकल प्रवासासाठी नेमके काय नियम असणार:

हे वाचलं का?

  • लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार

  • दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी अनिवार्य

  • ADVERTISEMENT

  • स्मार्टफोनवर रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सोय

  • ADVERTISEMENT

  • स्मार्टपोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस

  • पासवरील क्यूआर कोडमुळे अधिकृतता कळणार

  • लोकल प्रवासाबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    ‘आज मी आपलुकीच्या भावनेतून सांगतो आहे की, काही ठिकाणी आपण शिथिलता आणतो आहोत. जसं मुंबईचा विचार केल्यास मुंबईचा लोकल प्रवास कधी सुरु करणार. तर लोकल प्रवास आपण सुरु करतो आहोत ते आपल्या स्वातंत्र्य दिनापासून. म्हणजेच 15 ऑगस्टपासून.’

    ’15 ऑगस्टपासून लोकल माझ्या मुंबईतील नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आणि दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेले आहेत त्यांना ही मुभा आपण देत आहोत. मी 15 ऑगस्ट का म्हणतो आहे, उद्यापासून का म्हणत नाहीए? तर ते एवढ्यासाठी की, आपण या लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी एक अॅप तयार केलेलं आहे. त्या अॅपची माहिती आज-उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहचेल.’

    ‘त्या अॅपवर आपण अॅप्लिकेशन करायचा की, मी दोन्ही लस घेतलेला व्यक्ती आहे. लस घेऊन मला एवढे दिवस झालेले आहेत. माझा बारकोड क्रमांक हा अमुक आहे. हे केल्यानंतर आपल्याला एक पास मिळेल. काही जणं म्हणतील हे ठीक आहे पण ज्यांच्याकडे फोन नाही त्यांना काय? त्यांच्यासाठी सुद्धा आपण मुंबईतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने हे पास देणार आहोत.’

    ‘आज साधारण मुंबईत 19 लाख असे नागरिक आहेत की, ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत आणि ज्यांना 14 दिवस देखील पूर्ण झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात आपल्याकडे आज 19 लाख लोकं आहेत 15 ऑगस्टनंतर दरदिवशी यामध्ये वाढ होत जाणार आहे. एकदा का आपण ही सवय लावली, आपल्याकडे सर्वांकडे पासेस आले की, साहजिकच आहे की, आपण रेस्टॉरंट असेल, मॉल असेल या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने आपण सुरु करु शकतो.’

    CM Uddhav Thackeray: अत्यंत मोठी बातमी… 15 ऑगस्टपासून Mumbai Local सुरु, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    ‘मला असं वाटतं की, आधी ज्यांचं तळहातावर पोट आहे अशा माझ्या नागरिकांसाठी आपण 15 ऑगस्टपासून लोकलचा प्रवास त्यांना सुरु करायला देत आहोत परंतु 15 तारखेपर्यंत या अॅपवर म्हणा नाहीतर विभागीय कार्यालयात जाऊन आपण ते पासेस घ्यावे ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT