Ashish Shelar : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर, मुंबई अध्यक्ष झाल्यावर पहिली घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. या निवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेत बदल निश्चित होणार अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिका ही आमची जहागीर आहे असं समजत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून आम्ही काढून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खड्ड्यांची समस्या, त्याच त्याच कंत्राटदारांना पोसणं, कोस्टल रोडचं निकृष्ट काम असे असंख्य विषय आहेत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईकरांच्या स्वप्नातलं चित्र भाजप पूर्ण करणार

मुंबईकरांना मी शब्द देतो की मागच्या २५ वर्षात तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात होतं तेच चित्र साकारण्याचं काम भाजप करेल. भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आम्ही तडीपार करणार हे आमचं ठरलं आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आमचा महापौर बसवण्यासाठी महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं हे आमचं लक्ष्य आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत यावेळी परिवर्तन होणारच असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी?

आमच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना संघर्ष करू शकत नाही. मुंबईत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि महापौर आमचाच बसेल याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. मागच्या २५ वर्षांपासून मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या स्वप्नातली जी मुंबई घडवायची आहे ती भाजपच घडवून दाखवेल असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. तसंच प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदनही आशिष शेलार यांनी केलं.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचारी शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसणार ही गर्जना आज आशिष शेलार यांनी केली.

सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे हात झटकू शकत नाही. आमचं ठरलं आहे भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायचं आहे. मुंबईकरांच्या मनात असलेलं विकासाचं चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT