Nitin Gadkari: ‘मुंबई मेट्रोला कारशेडची गरजच नाही’, गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: मुंबई मेट्रो-3 यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षापासून खडाजंगी पाहायला मिळत आहेत. जेव्हापासून या प्रोजेक्टच्या कारशेडसाठी मुंबईतील आरे जंगलाची जागा निवडण्यात आली तेव्हापासून याला अनेकांनी प्रचंड विरोध केला. याच कारशेडवरुन आता देखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे नुकतंच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई Tak’ला दिलेल्या मुलाखतीत थेट म्हटलं होतं की, आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा इगोमुळे आरेमध्ये कारशेड झालं नाही. त्यामुळेच मेट्रो-3 ची हत्या झाली. असं असताना आता भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील हेविवेट नेते नितिन गडकरी यांनी मात्र मुंबई मेट्रोच्या कारशेडबाबत वेगळंच विधान केलं आहे.

‘मुंबई मेट्रोला कारशेडची गरजच नाही.’ असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. एवढंच नव्हे तर कारशेडचा हा प्रश्न कसा सुटेल याबाबत देखील त्यांनी एक अगदी सोपा पर्याय सुचवला आहे. ‘मुंबई Tak’ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी आपलं हे मत मांडलं आहे. पाहा नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले.

हे वाचलं का?

नितीन गडकरी यांनी ‘मुंबई Tak’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुंबई मेट्रोच्या कारशेडवरुन जो काही वाद सुरु आहे त्याविषयी विचारण्यात आलं. पाहा त्यावर गडकरींनी नेमकं काय उत्तर दिलंय.

‘केंद्राकडून संपूर्ण सहाकार्य केलं जातं आहे. आज पाहा नागपूरची मेट्रो पूर्ण झाली. पुण्याची मेट्रो पूर्ण होत आली. मुंबईच्या मेट्रोचं काम जोरात सुरु आहे. कुठे भारत सरकारने अडवलेलं आहे?’

ADVERTISEMENT

‘मी मेट्रोचा जो अभ्यास केला त्यानुसार खरं तर कारशेडची गरजच नाही. कारण कसं आहे की, एखाद्या प्लॅटफॉर्मला क्राँकिटचा बेस करुन मेट्रो उभी केली की, पटापट सर्व्हिसिंग करता येईल. माझ्या हिशोबाने मेट्रोसाठी कारेशेडची गरज नाही. त्यामुळे अशा वादात पडण्यापेक्षा भारत सरकारसोबत राज्य सरकारने आपसात चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा.’ असं मत गडकरींनी व्यक्त केलं आहे. याचवेळी त्यांनी पर्याय देखील सुचवला आहे.

ADVERTISEMENT

फडणवीस म्हणाले होते, मेट्रो-3 ची हत्या झाली…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच फडणवीस म्हणाले होते की, मेट्रो-3 हत्या झाली आहे. पाहा त्यांनी त्यावेळी नेमकं काय भाष्य केलं होतं.

‘मी तर म्हणेन मेट्रो-3 प्रकल्पाची हत्या केलीए या सरकारने हत्या. फक्त इगोकरता ही हत्या आहे. याचं कारण मेट्रो-३ मध्ये ही जी काही आरे कारशेडची जागा होती या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णयात असं म्हटलं आहे की, त्या आरे कारशेडच्या जागेवर जेवढी झाडं होती या झाडांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन मिळवलं असतं तेवढं मेट्रो 80 दिवसात करेल. त्यामुळे कोर्टाने परवानगी दिली आणि झाडं कापण्यात आली.

‘400 कोटी रुपयांचं काम होतं त्यापैकी 100 कोटी रुपयांचं काम पूर्ण झालं. 300 कोटी रुपयांचं काम पूर्ण होऊन मेट्रो सुरु होऊ शकली असती. केवळ तुमच्या इगोखातर तुम्ही त्या ठिकाणाहून तो कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवला.’

‘बरं कारशेड अशा ठिकाणी हलवलं की, तुमचेच मुख्य सचिव कमेटीचे चेअरमन असताना इथे शक्य नाही असं आमच्या काळात सांगितलं. तुम्ही कमेटी तयार केली.. तुमच्या कमेटीनेही सांगितलं की शक्य नाही. मग कशाकरता? म्हणजे इगोकरताच ना..’

‘आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे मेट्रो-3 प्रकल्पाची हत्या झाली आहे. मी सभागृहात देखील बोललो आहे. केवळ आणि केवळ इगोकरता. याठिकाणी एक भूमिका आम्ही घेतली आणि ठाकरे भूमिका कशी बदलतील?…’

‘अरे हात जोडतो बाबा… मुंबईकरांकरता तयारी आहे आमची असंही सांगितलंय. पण हे मुंबईकरांना वेठीस का धरतात? हा प्रोजेक्ट डेडलाइनवर होणार नाही. संपला हा प्रोजेक्ट.’

फडणवीसांकडून दिल्ली मेट्रोचं कौतुक, राज्यातलं राजकारण तापलं

‘उद्या जर ते म्हणतायेत तिथे जर कारशेड नेलं.. तर दोन्ही कमिटींचा अहवाल आहे की, जमीन मिळविण्यासाठीच दोन वर्ष जाईल. नंतर दोन वर्ष त्याच्या बांधकामासाठी जातील. म्हणजे चार वर्ष आता या प्रोजेक्टसाठी जाईल.’

‘ज्या जमिनीवर ठाकरे सरकार कारशेड उभारण्याबाबत बोलत आहे त्याच जमिनीसाठी मी 2015 साली गेलो होतो हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की, प्रायव्हेट पार्टीला 2500 कोटी द्या… तेव्हा, त्यामुळे त्याचा दावा तेव्हा मान्य केला होता हायकोर्टाने. त्यामुळे आता केवळ केंद्र आणि राज्य यात पार्टी नाहीए.’

‘हे MMRDA च्या बापाचे पैसे आहेत का? हा जनतेचा पैसा आहे. असा कसा घालवता येईल. असा कसा दुसऱ्याच्या घशात घालता येईल तो? जे 400 कोटीचं काम हे तुमच्या मोफतच्या जमिनीवर होतंय. जिथे 100 कोटीचं काम झालं देखील आहे त्याऐवजी 3-4 हजार कोटी फक्त जमिनीसाठी देणार.’

‘म्हणजे तुम्ही काही तरी भूमिका घेणार.. तुम्ही महान आहात.. पर्यावरण वैगरे नाही. पर्यावरणाचा निकाल हा स्वत: सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे तुम्ही डिले करता आहात. उलट मुंबईतील जे प्रदूषण आहे ते तुमच्या निर्णयामुळे वाढतं आहे.’

‘इगो सोडला तरच हा प्रोजेक्ट मार्गी लागेल. आरेमधील झाडं तुटलेली आहेत. 100 कोटीचं काम झालेलं आहे. 300 कोटीचं काम केलं की, आपण आठ ते नऊ महिन्यात काम सुरु करु शकतो.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. फक्त आपल्या इगोकरता त्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं असंही ते यावेळी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT