Mumbai Rains: 13 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्टही जारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईसह कोकणात पुढचे तीन दिवस म्हणजेच 13 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. IMD ने अर्थातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 9 ते 13 जून या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 9 जूनला मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी सब वे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं. पावसाच्या साठलेल्या पाण्यातून वाट काढणं हे वाहनांना कठीण जात होतं.

ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा धोका, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आदेश

मुंबईतल्या मालाडमध्ये मुसळधार पावसाचा जोर ओसरल्यानंतर इमारत कोसळल्याची दुर्घटनाही घडली आहे. मुंबई प्रमाणेच कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पाऊस झाला आहे. आता आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये रात्रभरापासून पाऊस कोसळतो आहे.

हे वाचलं का?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळला, आता दिवसा पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पावसाची उघडीप आहे तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. मुंबईत आज दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून उंच लाटा उसळणार आहेत असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये म्हणजेच विदर्भ मराठवाडा या ठिकाणीही पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबादमध्ये मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही बंद पडली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT