Impact: हायकोर्टाच्या दणक्यानंतर खिरखिंडी गावातील विद्यार्थ्यांना मिळणार फायबर बोट, पाहा लाइफ जॅकेट कुणी दिलं

इम्तियाज मुजावर

सातारा: सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मुंबई Tak ने दिलेल्या वृत्तानंतर स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. ज्यानंतर संपूर्ण प्रशासन हे खडबडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सातारा: सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मुंबई Tak ने दिलेल्या वृत्तानंतर स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. ज्यानंतर संपूर्ण प्रशासन हे खडबडून जागं झालं. त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकारी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट दिली आणि नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली.

जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 25 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूलमध्ये जावे लागते.

सह्याद्री वाघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असलेल्या खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी व कुसापूर या गावातील 70 कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एकसाल सागाव या ठिकाणी वन्य विभागाने केले असून त्यासाठी 242 हेक्टर जमीन संपादित केली आहे. 70 कुटुंबापैकी 6 कुटुंबांनी जमीन ताब्यात घेतलेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp