Maharashtra Unlock : BEST सेवा आजपासून मुंबईकरांच्या सेवेत
राज्य शासनाने सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉकची घोषणा केली. यासाठी सरकारने काही नियम व निकष ठरवून दिले आहेत. ज्यात मुंबईचा समावेश हा तिसऱ्या स्तरात होतो आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेली BEST ची बससेवा आजपासून सुरु होणार आहे. मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार बेस्टची बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. Maharashtra Unlock : उपराजधानी नागपूरचा समावेश […]
ADVERTISEMENT
राज्य शासनाने सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉकची घोषणा केली. यासाठी सरकारने काही नियम व निकष ठरवून दिले आहेत. ज्यात मुंबईचा समावेश हा तिसऱ्या स्तरात होतो आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेली BEST ची बससेवा आजपासून सुरु होणार आहे. मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार बेस्टची बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT
Maharashtra Unlock : उपराजधानी नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात, जिल्हाधिकाऱ्यांकडून Guideline जाहीर
परंतू या प्रवासादरम्यानही प्रवाशांना सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. बसच्या क्षमतेइतकेच प्रवासी यावेळी प्रवास करु शकणार आहेत. तसेच प्रवास करणाऱ्या प्रत्येक पॅसेंजरला मास्क घालणं बंधनकारक करण्यात आल्याचंही बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, मुंबई लोकल येत्या काही दिवासंमध्येही फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सुरू राहणार आहे. नव्या आदेशांमध्ये Women हा शब्द वगळण्यात आला आहे. शहर अनलॉक करण्याच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या लेव्हलवर आहे त्यामुळे सोमवारपासून सरसकट सगळे निर्बंध उठवले जाणार नाहीत.
मुंबईत काय काय सुरू होणार जाणून घेऊ..
ADVERTISEMENT
-
नागरिकांना पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत मॉर्निंग वॉक, सायकलिंग करण्यास संमती देण्यात आली आहे
ADVERTISEMENT
खासगी कार्यालयं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास संमती
बेस्ट बसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार मात्र बेस्टमध्ये उभं राहून प्रवास करण्यास मनाई
रेस्तराँ, सलून, स्पा हे सगळं काही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी एसी सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे
सर्व दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील आणि शनिवार रविवार बंद राहतील
काय बंद राहणार आहे?
-
लोकल सामान्यांसाठी बंद राहणार आहे
-
संध्याकाळी पाचनंतर शहरात संचारबंदी असणार आहे
-
रेस्तराँ उघडण्यास संमती देण्यात आली असली तरीही मॉल्स आणि सिनेमागृहं, नाट्यगृहं बंद राहणार आहेत
-
मुंबई लोकलबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे?
मुंबई लोकल प्रवासाच्या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकलच्या संदर्भात मुंबई महापालिका जे नियम लागू करेल तेच नियम MMR रिजनमधल्या इतर महापालिकांनाही पाळणं बंधनकारक असणार आहे. दुसऱ्या महापालिकांना लोकल प्रवासासंदर्भात काही वेगळे नियम तयार करायचे असतील तर त्यांना मुंबई महापालिकेशी चर्चा करावीच लागेल असं आता सरकारने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT