मुस्लिमांनी त्यांच्या घरी नमाज अदा करावी, सार्वजनिक स्थळी नाही-प्रवीण तोगडिया
जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा मुस्लिमांनी त्यांच्या घरी नमाज अदा करावी, सार्वजनिक स्थळी नाही असा इशारा आता विहिंपचे प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. मुस्लिम समाज सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करता, त्यानंतर तिथे मशिद स्थापन करून ती अल्लाची प्रॉपर्टी घोषित करतात. मुस्लिमांनी नमाज त्यांच्या घरी अदा करावी. मुस्लिम समाजाने त्यांच्या घरी नमाज अदा करावी किंवा मशिदीत अदा […]
ADVERTISEMENT
जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
ADVERTISEMENT
मुस्लिमांनी त्यांच्या घरी नमाज अदा करावी, सार्वजनिक स्थळी नाही असा इशारा आता विहिंपचे प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. मुस्लिम समाज सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करता, त्यानंतर तिथे मशिद स्थापन करून ती अल्लाची प्रॉपर्टी घोषित करतात. मुस्लिमांनी नमाज त्यांच्या घरी अदा करावी. मुस्लिम समाजाने त्यांच्या घरी नमाज अदा करावी किंवा मशिदीत अदा करावी. सार्वजनिक स्थळी नमाज अदा करणाऱ्यांना भाजप सरकारने तुरुंगात टाकावं असंही तोगडिया यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांना ‘भारतरत्न’ पुरस्कार का मिळाला पाहिजे, प्रवीण तोगडिया म्हणतात…
हे वाचलं का?
समीर वानखेडेंवरही भाष्य
समीर वानखेडे मुस्लिम आहेत असं नवाब मलिक यांनी विचारलं असता प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं की मला या प्रकरणात पडायचं नाही. मात्र समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटवर संशय घ्यायला जागा आहे असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
जे कृषी कायदे रद्द करण्यात आले त्याबाबत विचारलं असता तोगडिया म्हणाले की कृषी कायदे आधीच रद्द केले असते तर 700 निरपराध शेतकऱ्यांचे प्राण गेले नसते असंही तोगडिया यांनी म्हटलं आहे. 10 महिन्यांपूर्वीच कृषी कायदे मागे घ्यायला हवे होते. आता ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांनी एक कोटी रूपये सरकारने दिले पाहिजे असंही प्रवीण तोगडियांनी म्हटलं हे.
ADVERTISEMENT
भाजपवरही त्यांनी टीका केली आहे. तोगडिया यांना प्रश्न विचारण्यात आला की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्तेत आहे. त्यावर तोगडिया म्हणाले की भाजपने जेव्हा पाकिस्तानी विचारसरणीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली होती तेव्हा कुणी हा प्रश्न विचारला होता का? भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये महबूबा मुफ्ती देशभक्त होतात आणि प्रवीण तोगडिया देशद्रोही होतो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंना भारत रत्न द्या ही मागणी तोगडियांनी 6 डिसेंबरला केली होती
प्रभू रामचंद्र मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे चार जण होते. बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवलं पाहिजे. राम मंदिर आंदोलनात या चौघांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता या चौघांनाही भारतरत्न देऊन गौरवलं पाहिजे असं तोगडिया यांनी म्हटलं आहे. तोगडिया यांनी ही मागणी याआधीही केली होती. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना हे वक्तव्य आणि ही मागणी तोगडिया यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT