म्यानमारमध्ये लष्कराचं बंड, आंग सान सू की अटकेत, 1 वर्षाची आणीबाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये लष्करानं बंड केलंय. म्यानमारच्या सैन्यानं सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आँग सान सू की यांना अटकेत घेतलंय. तसंच वर्षभरासाठी आणीबाणी लागू करण्यात आलीय. म्यानमारच्या सैन्य दलाच्या टीव्हीवरून तशी घोषणाच करण्यात आलीय.

ADVERTISEMENT

आता वर्षभरासाठी म्यानमारचा सारा कारभार सैन्य दलाकडून हाकला जाणार आहे. सैन्यदलाचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्याइंग यांच्याकडे हा कारभार येणार आहे.

म्यानमार सैन्यदलाच्या मते, ‘निवडणुकीतल्या हेराफेरीला प्रत्यूत्तर म्हणून सत्तांतराची ही कारवाई करण्यात आलीय. या सत्तांतरासोबतच देशाच्या वेगवेगळ्या भागात आता सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. म्यानमारमधलं मुख्य शहर असलेल्या रंगून इथल्या सिटी हॉलबाहेर सैनिक तैनात करण्यात आलेत. सत्तांतरानंतरचा संभाव्य विरोध चिरडून टाकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.’

हे वाचलं का?

विशेष बाब म्हणजे, म्यानमारमध्ये दीर्घकाळापासून सैन्याची सत्ता राहिलीय. १९६२ पासून २०११ पर्यंत देशात लष्करी हुकुमशाहीने सत्ता चालवलीय. २०११ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नागरिकांची सत्ता आली. यात नागरिकांनीच आपले लोकप्रतिनिधी निवडून दिले. सत्ता बदल झाला तरी सत्तेची खरी ताकद ही सैन्याच्या हातातच राहिलीय. त्यामुळे सोमवारी जे सत्तांतर झालं ते म्यानमारमधल्या राजकारणाचा, सत्तेचा खरा चेहरा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दरम्यान, म्यानमारमधल्या या सत्तांतराबद्दल अमेरिका, ऑस्ट्रेलियासोबतच अनेक देशांनी चिंता व्यक्त केलीय. म्यानमारच्या सैन्याला कायद्याचा सन्मान करण्याचं आवाहन केलंय. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी म्हणाल्या, ‘म्यानमारच्या सैन्याने आंग सान सू की आणि नेत्यांना अटक केलीय. असं करून देशातल्या लोकशाही संक्रमणामध्ये बाधा टाकण्याचं काम केलंय.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT