अडचणीत सापडलेल्या नानांनी थेट ‘त्या’ मोदीला पत्रकारांसमोर केलं हजर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

भंडारा-गोंदिया येथे निवडणुक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच अडचणीत आले. भाजप याविरुद्ध आक्रमक झाल्यानंतर नाना पटोलेंविरुद्ध राज्यभरत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी होऊ लागली. यानंतर नाना पटोलेंनी यू-टर्न घेत आपण उल्लेख केलेला मोदी हा गावातला गुंड असल्याचं सांगितलं.

हे प्रकरण चांगलंच गाजत असताना नाना पटोलेंनी आज नागपुरात आपले वकील सतीश उके यांच्याकरवी आपला दावा खरा करुन दाखवण्यासाठी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे याला प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं.

हे वाचलं का?

अखेर मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना गवसला, पण..

मी मोदींना मारु शकतो असं वक्तव्य नाना पटोलेंनी केल्यानंतर राज्यभर गदारोळ उडाला होता. भंडारा-गोंदियात असा कोणता मोदी नावाचा गावगुंड आहे की नाही यासाठी प्रसारमाध्यमांनी शोधमोहीमही राबवली. परंतू नानांनी उल्लेख केलेल्या मोदीवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

ADVERTISEMENT

यावेळी नागपुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद पटोलेंचे वकील उके यांनी उमेश घडे यांनाच नाना पटोले मोदी उद्देशून बोलल्याचं सांगितलं. यावेळी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे यांनीही दारुच्या नशेत मी नाना पटोले आणि काँग्रेसला मतदान करु नका असं बोललो होतो. यावेळी मी शिवीगाळ केल्याचंही उमेश घडे यांनी मान्य केलं. पत्रकार परिषदेनंतर वकीलांनी उमेश घडे यांच्याशी कोणताही पत्रकार संवाद साधणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातली सत्यता तपासाअंती समोर येणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT