Nana Patole : ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला’; नाना पटोले का भडकले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत नवीनच आघाडी बघायला मिळाली. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये भंडारा-गोंदियात मात्र बिनसलं आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत सुरा खुपसल्यची टीका केलीये.

ADVERTISEMENT

भंडारा आणि गोंदिया येथील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच एकमत होऊ शकलं नाही. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजप बरोबर हाथमिळवणी केली. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या (नाना पटोले ) भंडारा जिल्ह्यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाली.

राष्ट्रवादीने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानं नाना पटोले यांनीही भाजप फोडली. चरण वाघमारे गटाने साथ दिल्याने काँग्रेसने आपला अध्यक्ष बसवला. तर उपाध्यक्ष पद चरण वाघमारे गटाकडे गेले आहे.

हे वाचलं का?

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या भाजप गटाने भंडारा जिल्ह्यात कॉग्रेसला सात दिल्यानं चरण वाघमारे यांची ६ वर्षा करिता भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या सगळ्या राजकीय खेळीनंतर नाना पटोले म्हणाले, ‘भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. आम्ही जयंत पाटील व प्रफुल पटेल यांच्या बोलल्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली.’

ADVERTISEMENT

‘गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला,’ असं विधान नाना पटोलेंनी केलं आहे.

ADVERTISEMENT

गोंदियातही राष्ट्रवादीने काँग्रेसला दूर ठेवत भाजपला साथ दिली. भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला आहे. महाविकास आघाडीत जरी पटोले आणि प्रफुल पटेल हे एक असले, तरी भंडारा-गोंदियात हे ऐक्य दिसले नाही.

या निवडणुकीत पारंपरिक वैर परत समोर आलं आहे. याचे येणाऱ्या निवडणुकांवर परिणाम पडणार हे मात्र निश्चित आहे. गोंदियात भाजपने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाशी हातमिळविणी करीत सत्ता स्थापन केली आहे. ‘जिल्ह्याचा विकास करण्यासाठी भाजपला साथ दिली आहे,’ असं राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले?

नाना पटोले यांच्या आरोपाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘राज्यस्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय नेते शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीच्या बाबत निर्णय घेतात. जिल्ह्याच्या स्तरावर निर्णय घेत असताना जिल्ह्यातील नेतेमंडळींना माहिती दिली जाते. प्रत्यक्षात काय घडल आहे हे अद्याप मला माहित नाही,’ असं अजित पवार पटोलेंच्या विधानावर म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT